सर्वांनाच सोशल मीडियावर प्राण्यांचं व्हिडिओ पाहायला आवडतात. वाघ, सिंह चिता यांनी केलेल्या शिकारीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. तुम्ही असाही व्हिडिओ पाहिला असेल, ज्यात जंगल सफारीच्या वेळी जंगलाचा राजा सिंहाने पाठलाग केला. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये चिता (Cheetah) कारच्या वरती चढून बसला असून आतमध्ये असणारी मुलगी त्याचं व्हिडिओ शूट करत आहे. या व्हिडिओला भारतीय वनआधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे.

या व्हिडिओत स्पष्ट दिसतेय की, कार जंगालाच्या मधोमध उभी आहे आणि एक मुलगी मोबाइलवरून जंगल सफारी शूट करत आहे. त्याचवेळी एक चिता तिथे येतो आणि कारच्या वरती जाऊन बसतो. हा सर्व प्रसंग त्या महिलेनं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

सुशांत नंदा यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहलं आहे की, ‘हा चिता आहे, कोणी चितापाहून इतकं शांत कसं राहू शकतं. अशा परिस्थितीमध्येही व्हिडिओ शूट कसं करू शकतो’

या व्हिडिओला १९ एप्रिल रविवारी पोस्ट करण्यात आलं आहे. व्हिडिओला आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तर ६०० पेक्षा जास्त जणांनी लाइक केला आहे.