scorecardresearch

VIRAL VIDEO : चोरटा सायकल चोरण्यासाठी घरात घुसला…पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही !

चोर चोरी करण्यासाठी घरात घुसला खरा… पण घरात त्याच्यासोबत असं काही घडलं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. चोरट्याचा सगळा ‘स्वॅग’ पाण्यात गेला. पाहा हा VIRAL VIDEO…

Thief-Breaks-Into-House-to-Steal-Cycle-viral-video-trending
(Photo: Instagram/ memes.bks)

Thief Breaks Into House to Steal Cycle: एका चोराचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा चोर चोरी करण्यासाठी घरात घुसला खरा… पण घरात त्याच्यासोबत असं काही घडलं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. चोरट्याचा सगळा ‘स्वॅग’ पाण्यात गेला. चोराचा हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलाय. इन्स्टाग्रामवर एका मीम पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सतत मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ तर असे असतात जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर काही व्हिडीओ पोट धरून हसण्यास भाग पाडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतं, की चोर चोरी करण्यासाठी एका घरात घुसतो. घर मालक मुख्य गेट बंद करण्यास विसरला, याचाच फायदा घेऊन हा चोर दिवसाढवळ्या मोठ्या स्वॅगमध्ये घरात घुसला. सुरूवातीला तो घरात कोणी आहे की नाही हे पाहण्यासाठी इकडे-तिकडे पाहतो. कोणाचं त्याच्याकडे लक्ष जाईल का हे आधी तो तपासून घेतो.

घराच्या व्हरांड्यात एक स्कूटी आणि सायकल उभी केली होती. हा चोर घराबाहेर उभी केलेली स्टील सायकल घेऊन घाईघाईने दरवाजाच्या पळून जातो. यादरम्यान घरमालकाने चोराला पाहिलं आणि तो त्याच्या मागे धावत जातो. मात्र, पुढे काय झाले ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले नाही. मात्र घर मालकाने चोरट्याला रंगेहाथ पकडलं.

आणखी वाचा : पाठीवर दप्तर घेऊन सायकल चालवणाऱ्या माकडाचा हा VIRAL VIDEO पाहाच…; नेटकरी हसून लोटपोट

आणखी वाचा : VIRAL VIDEO : रस्त्यावर अचानक सुरू झाला डॉलरचा पाऊस! नोटा जमा करण्यासाठी लोकांची गर्दी

काही वेळाने मालक आपली सायकल घरी परत आणताना दिसला. या व्हिडीओच्या मध्यभागी टाकलेली मीम क्लिप आणि बॅकग्राऊंडला वाजणारे गॅसोलिना गाणं यामुळे हा व्हिडीओ पाहण्यात मजा आली. हे पाहून युजर्स खूप हसत आहेत आणि वेगवेगळ्या फनी इमोजीसह कमेंट करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ हैराण करणारा तर आहेच मात्र सोबतच खळखळून हसवणाराही आहे. चोराचा अनोखा अंदाजा लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

memes.bks नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. पाच दिवसापूर्वी हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात या व्हिडीओला २५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या वाढतच आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडीओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-11-2021 at 20:07 IST

संबंधित बातम्या