करोना विषाणूमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता ११० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये एका मुलीने चक्क विमानातील टॉयलेट चाटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मियामीमध्ये राहणारी टिक-टॉक स्टार आहे. तिचे नाव Ava Louise असे असून ती २१ वर्षीय आहे. तिने सोशल मीडियावर ‘करोना व्हायरस चॅलेंज’ असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानातील टॉयलेट चाटताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. अनेकांनी तिला माफी मागावी असे म्हटले आहे.

Ava ने १५ मार्चला तिच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने विमानाच्या टॉयलेटमध्ये कशी असते साफसफाई असे कॅप्शन दिले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus challenge tiktok star liking an airplane toilet seat avb
First published on: 18-03-2020 at 12:43 IST