Premium

एकावं ते नवलंच! जोडप्यानं ट्रेनमध्ये केलं लग्न; गर्दी बघून घाबरली तरुणी अन्…VIDEO चा शेवट नक्की पाहा

Viral video: खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये उरकलं लग्न, कपलचं फिल्मी स्टाईल लग्न

Couple got married in a running train the video is going viral on social media
लोकल ट्रेनमध्ये दोघांनी सर्वांसमोर लग्न केलं.

Viral video: आज-कालची तरुणाई इतकी बिनधास्त आहे की त्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही. आजच्या तरुणाईला कुणाच्याही बंधनात रहायचं नाहीये. आई-वडिलांनी एखाद्या गोष्टीला नकार दिला की ते त्यांना मोठे शत्रू वाटू लागतात. मात्र त्यामागची त्यांची भावना कळत नाही. यामुळेच पळून जाऊन लग्न करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. हल्ली मुल-मुली कोणताही विचार न करता घरच्यांना फसवून पळून जाऊन लग्न करतात. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये या जोडप्यानं चक्क ट्रेनमध्येच लग्न उकरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. आतापर्यंत आपण पाहिलं आहे मंदिरात, कोर्टात जाऊन लग्न करतात. मात्र या जोडप्यानी चक्क ट्रेनमध्ये एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केलंय. मुलाने मुलीच्या भांगेत कुंकु भरून हे लग्न पार पाडलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलीने ट्रेनमध्ये उपस्थित लोकांसमोर त्याला मिठी मारली. ट्रेनमधली सगळी गर्दी या जोडप्याच्या भोवती जमली आहे. या गर्दीतले लोकच यांना लग्नासाठी पाठिंबा देताना दिसत आहेत. तर मुलगी प्रचंड घाबरल्याचे दिसत आहे.

ही घटना आसनसोल ते जसिडीह मार्गादरम्यान घडली आहे. जिथे लोकल ट्रेनमध्ये दोघांनी सर्वांसमोर लग्न केलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>संतापजनक! ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्यांनी लिफ्ट वापरल्यास १००० रूपयांचा दंड; हायक्लास सोसायटीचा दुजाभाव

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @max_sudama_1999 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Couple got married in a running train the video is going viral on social media srk

First published on: 28-11-2023 at 13:18 IST
Next Story
हातपंपातून पाण्याऐवजी येऊ लागलं दूध? लोकांनी बाटल्या आणि पिशव्यांमधून सुरु केली लूट, VIDEO पाहून डोकंच धराल