मेट्रोमधील अश्लील कृत्यांचे व्हिडिओ हे सातत्याने समोर येत असतात, अशाच एक व्हिडीओ बंगळुरूमधून समोर आला आहे. या व्हिडीओत तरुण-तरुणी मेट्रोमध्ये अश्लील चाळे करताना दिसून येत आहेत. या मेट्रोतील अन्य एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईमध्ये कैद असून या तरुण-तरुणी विरोधात कारवाई करण्याची मागणी बंगळुरू मेट्रो प्रशासनाकडे केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – ‘दादा प्लिज मला पुन्हा बोटीत घ्या…’ रिव्हर राफ्टिंग दरम्यान महिलेला उतरवलं पाण्यात अन्… पाहा धक्कादायक VIDEO

या घटनेचा व्हिडीओ प्रवाशाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तरुण-तरुणी एकमेकांचे चुंबन घेताना दिसून येत आहेत. या पोस्टमध्ये प्रवाशाने लिहीले की, ”आपल्या मेट्रोमध्ये नेमकं काय चाललंय? हळूहळू बंगळुरू मेट्रो दिल्ली मेट्रोमध्ये परावर्तीत होत आहे. या तरुणांवर कारवाई व्हायला हवी.” तसेच या प्रवाशाने बंगळुरु पोलिसांनाही या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.

महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनीही तत्काळ या व्हिडीओची दखल घेतली असून ज्या प्रवाशाने हा व्हिडीओ पोस्ट केला, त्याच्याशी संपर्क केला असल्याचे बंगळूरू पोलिसांनी सांगितले आहे. तसेच याप्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले. मात्र, ही घटना नेमकी कधीची आहे, याची पुष्टी होऊ शकलेली नाही.

हेही वाचा – किती मोठं धाडस! सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अ‍ॅनाकोंडासोबत केलं शूट; अन् पुढे घडलं असं काही… थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीत मेट्रो अशाच प्रकारची घटना घडली होती. या घटनेचाही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत काही तरुणी आपल्या चेहऱ्याने दुसऱ्या तरुणीच्या चेहऱ्याला रंग लावताना दिसून येत होत्या. या व्हिडीओवरही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.