Viral Video: आपल्यातील अनेकांना पाण्यातील साहसी खेळांचा आनंद घ्यायला आवडतो. त्यात पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग आदी वॉटर स्पोर्ट्स खूप प्रसिद्ध आहेत. त्यातचं ऋषिकेशचे रिव्हर राफ्टिंग संपूर्ण भारतात खूप लोकप्रिय आहे. येथे जाणार प्रत्येक पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा अनुभव हा घेतोच. तर आज ऋषिकेशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत एका महिलेला पाण्यात उतरवल्यावर भीती वाटायला लागते व ती पुन्हा बोटीत जाण्याचा आग्रह करताना दिसते. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत लाइफ जॅकेट घातलेल्या महिलेला साहसी खेळाचा एक भाग म्हणून पाण्यात ढकलण्यात आले. पण, पाण्यात उतरल्यावर काही सेकंदातच महिलेला भीती वाटू लागली व तिला पुन्हा बोटीवर यायचे होते. तर, टूर गाईड तिला मागे खेचायला तयार नव्हता आणि तो तिला पाण्यात राहण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यामुळे महिलेची चिंता आणखीन वाढली व ती टूर गाईडला विनंती करू लागली. नक्की पुढे काय घडलं? टूर गाईड आणि महिलेमध्ये नक्की काय संवाद झाला एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष? ट्रोलरला मुंबई पोलिसांनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाले, ‘तुमची विनोदबुद्धी…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ‘प्लिज दादा मला पुन्हा बोटीत घ्या’ अशी अनेक वेळा विनंती करून देखील टूर गाईड महिलेला पुन्हा बोटीवर घेण्यास काही तयार होत नाही आणि महिलेला सांगताना , ‘ मॅडम तुम्ही नाही बुडणार, तुम्ही लाईव्ह जॅकेट घातलं आहे ‘ असे वारंवार सांगताना दिसले . पण, महिला खूप घाबरली होती असे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत आहे.दोघेही हा संवाद हिंदी भाषेतून करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @adventure_ आणि @_rishabhandjituchauhan.jituchauhan.148 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण पोट धरून हसत आहेत. तर अनेक जण महिलेबद्दल चिंता व्यक्त करताना दिसले तर महिलेला परत बोटीवर न घेतल्याने टूर गाईडला कमेंटमध्ये खडे बोल सुद्धा सुनावले. याआधी सुद्धा ऋषिकेशचे रिव्हर राफ्टिंगचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण, या व्हिडीओने सगळ्यांनाच थक्क करून सोडलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman river rafting adventure in rishikesh goes horribly wrong users concerned about the lady watch viral video asp