आपल्या देशात प्रतिभावान लोकांची कमी नाही. काही लोकांमध्ये ही प्रतिभा इतकी भरलेली असते की पाहणारेही आश्चर्यचकीत होतात. विशेषतः जेव्हा आपण देशी जुगाडबद्दल बोलत असतो. सध्या सोशल मीडियावर एका देसी जुगाडचा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेने गायीचे दूध काढण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीची सर्वत्र चर्चा होत आहे. तुम्हाला माहीत असेलच की गाई-म्हशीच्या मुलाला काही झाले तर ते दूध देणे बंद करतात. या अवस्थेत अनेक जण इंजेक्शन किंवा दुसरी पद्धत अवलंबतात. या महिलेने गायीचे दूध काढण्याचा जो जुगाड केला, तो तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल किंवा ऐकला असेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला गायीचे दूध काढत आहे. यासाठी ती मुलाला गायीच्या वासराप्रमाणे बसवते आणि गायही त्या मुलाला आपल्या वासरूप्रमाणे चाटू लागते. या दरम्यान महिलाही आरामात दूध काढत आहे. दूध काढण्याची ही पद्धत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओला लाइक करत कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. एका युजर्सने लिहिलं आहे, हे तंत्रज्ञान राजस्थानच्या बाहेर जायला नको. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे, मला त्या मुलाचं कौतुक वाटते, जे वासरुसारखं बसलं आहे. हा व्हिडिओ अनेकांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.