सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे.सोशल मीडियावर मगरीचे अनेक व्हिडिओ येत असले तरी हा व्हिडिओ वेगळा आणि धोकादायकही आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क मगरीच्या जबड्या पाय ठेवण्याचं धाडस करतोय. त्यानंतर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण सगळ्यांसमोर मगरीसोबत स्टंटबाजी करताना दिसत आहे. या वेळी तरुन चक्क मगरीच्या तोंडात पाय टाकतो. मात्र तो पाय मागे घेण्यापूर्वीच मगरीने तो जबड्यात पकडला. खरं तर त्या भयंकर प्राण्यासोबत असं करून तो आपली ताकद आणि धाडस दाखवण्याचा प्रयत्न करत होता, पण दुसऱ्याच क्षणी त्या प्राण्याने त्याला पकडलं आणि मोठा धडा शिकवला. मगरीसारख्या प्राण्यापासून लोक चार हात लांबच राहतात, मात्र हा तरुण प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत होता, ती त्याच्या चांगलीच अंगलट आली.

A hungry tiger preys on a baby deer
वाघाची हुशारी पाहून तुम्हीही व्हाल चकित, हरणाच्या पिल्लाला झटक्यात काढलं शोधून; पाहा VIDEO
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: फोटो काढायला हत्तीच्या जवळ गेला, चवातळलेल्या हत्तीने तरुणाला भयंकर इंगा दाखवला

इंस्टाग्राम अकाऊंट snoopdogg शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एका धोकादायक मगरीसोबत स्टंट करणं एका व्यक्तीला महागात पडल्याचं पाहायला मिळतं.  या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत.