scorecardresearch

Premium

Video: हा दांडिया नाही, तर सुरू आहे पोलिसांचा लाठीचार्ज; उत्तर प्रदेशात रशियन डान्सरचा शो पाहण्यासाठी तोबा गर्दी

गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

crowd came watch russian dance jhansi went out of control police lathicharged video viral
Video: हा दांडिया नाही तर सुरु आहे पोलिसांचा लाठीचार्ज; उत्तर प्रदेशात रशियन डान्सरचा शो पाहण्यासाठी तोबा गर्दी (photo – @ImranTG1 twiiter)

परदेशी डान्सर्सचे डान्स शो अनेक भारतीयांसाठी नेहमी एक आकर्षणाचा विषय असतो. अशाचप्रकारे उत्तर प्रदेशातील झांशी मौरानीपूरमध्ये प्रांतीय जत्रा जलबिहार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे डान्ससाठी विदेशी डान्सरना आमंत्रित करण्यात आले होतो. परंतु, या कार्यक्रमात प्रचंड गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विदेशी डान्सर्सचा डान्स पाहण्यासाठी आलेली गर्दी इतकी नियंत्रणाबाहेर गेली की, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जलबिहार महोत्सवातील स्वीट नाईट कार्यक्रमात रशियन डान्सरला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी स्टेजवर रशियन डान्सरना पाहून गर्दीतील लोकही नाचू लागले. यानंतर जमाव अनियंत्रित झाला आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि बाऊन्सर्सनी लाठीचार्ज केला, त्यामुळे आणखी चेंगराचेंगरी झाली. या लाठीचार्जमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Munawar Faruqui
मुनव्वर फारुखीची एक झलक पाहण्यासाठी मुंब्र्यात लोकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकांचे मोबाईलही चोरीला
Boyfriend and girlfriend became ATM thieves to get married
नागपूर : प्रियकर-प्रेयसी लग्न करण्यासाठी बनले एटीएम चोर
Uttarakhand Violence
उत्तराखंडमध्ये हिंसाचार, वडील-मुलासह सहा जणांचा मृत्यू, १५० पोलिसांसह २५० जण जखमी, देवभूमीत नेमकं काय घडतंय?
Commissioner Dr Indurani Jakhar and police officers during a discussion on traffic congestion free welfare Dombivli cities meeting
कल्याण-डोंबिवली शहरे वाहन कोंडी मुक्त करण्यासाठी प्रभावी उपाय करा; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वाहतूक पोलिसांना सूचना

पोलिसांकडून बेछूट लाठीचार्ज

स्वीट नाईट कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असताना पोलिस तेथे उपस्थित होते. लोक शांतपणे बसून नृत्य पाहत होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असले तरी अचानक पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

पोलिसांनी केला खुलासा

या कार्यक्रमाला सुमारे १५ ते २० हजार लोक उपस्थित होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यादरम्यान बॅरिकेडिंग तुटून लोक एकमेकांवर पडले. यानंतर लोक आपापसात भांडू लागले. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले. यानंतर कार्यक्रम सुखरूप पार पडला.

या कार्यक्रमात डान्सर आणि सिंगर्सना आमंत्रित करण्यात आले होते, त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. यादरम्यान चेंगराचेंगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रशियन तरुणीच्या डान्सचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crowd came watch russian dance jhansi went out of control police lathicharged video viral sjr

First published on: 08-10-2023 at 18:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×