Accident News: सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ भयानक असतात. मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, असाच एक काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. रस्त्याच्या कडेला झाडू मारणाऱ्या एक महिलेला कार चालकानं अक्षरश: चिरडलं. धडक इतकी भीषण होती की, या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचं फुटेज आता समोर आलं आहे.

बुधवारी सकाळी गीता कॉलनीतील रहिवासी ६५ वर्षीय जानकी कुमारी या घराच्या समोरचा भाग स्वच्छ करण्यासाठी घराबाहेर पडल्या. काही मिनिटांनंतर, एका अनियंत्रीत कारने महिलेला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये तिचा मृत्यू झाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला घराबाहेर झाडू मारत असताना तिथून कार येते आणि थेट महिलेला धडक देते, याधडकेत महिला उडून समोरच्या बाजूला अडकते. यावेळी पोलिसांनी २५ वर्षीय मुकुल राठोड या आरोपीला अटक केली आहे, ज्याने सांगितले की, त्याने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने एक्सलेटरचे बटण दाबले. ज्यामुळे हा अपघात झाला. राठोड हे त्याच परिसरातील रहिवासी आहेत

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी

घटनेतील रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब नोंदवल्यानंतर, निष्काळजीपणा आणि रॅश ड्रायव्हिंगमुळे ओरपीवर आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, राठोड हा गाझियाबादमधील ग्राफिक डिझायनिंग फर्ममध्ये इंटर्न म्हणून काम करतो आणि तो पीडितेचा शेजारी आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोवर उधारी बंद”, दुकानदारानं लावलेली पाटी झाली व्हायरल

पोलिसांनी सांगितले की, आरोपी मद्यधुंद नव्हता आणि त्याच्याकडे वैध लर्निंग लायसन्स आहे, ते वाहन त्याच्या मेहुण्याचे आहे. नंतरचे मोटार वाहन कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यानुसार परवानाधारक चालकाने शिकाऊ परवाना धारण केलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसणे अपेक्षित आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.