पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच दिल्लीत काँग्रेसला धक्का बसला. पक्षाचे दिल्ली अध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाशी आघाडीला विरोध करत त्यांनी हे पाऊल उचलले. काँग्रेसचे दिल्ली प्रभारी दीपक बाबरीया यांच्या हकालपट्टीची मागणी नेत्यांनी केली आहे.

Ajit Pawar, ncp, local body election,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार; अजित पवार यांची मोठी घोषणा!
upsc president resign congress criticized
यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “संविधानिक संस्थांना…”
Pimpri, Ajit Pawar, ajit gavhane,
पिंपरी : अजित पवारांना धक्का! शहराध्यक्ष गव्हाणे शरद पवार गटात
Solapur Lok Sabha constituency, Sushilkumar Shinde, Sushilkumar Shinde Reveals BJP Leaders Supported Praniti Shinde, Praniti Shinde , congress, Solapur news, marathi news, latest news, loksatta news,
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी भाजप नेत्यांनी लावला हातभार, सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट
Nana Patole
“लपवाछपवीची मॅच नाही, ७० दिवसानंतर खरी…”, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
There is no alliance in Haryana Delhi Congress leader Jairam Ramesh signal
हरियाणा, दिल्लीत आपशी युती नाही! काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे संकेत
Key takeaways from PM Modi replies in Parliament
हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?
sam pitroda
सॅम पित्रोदा यांची पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड; वादग्रस्त विधानानंतर दिला होता राजीनामा

लवली यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात पक्षाच्या दिल्ली शाखेचा विरोध असतानाही आम आदमी पक्षाशी आघाडी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील पदाधिकाऱ्यांनी बाबरीया यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दिल्ली अध्यक्ष म्हणून यापूर्वीच लवली यांनी आक्षेप घ्यायला हवा होता, असे बाबरीया यांनी नमूद केले. लवली यांनी मात्र पदाचा राजीनामा दिला असून, कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा >>>स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती

उमेदवारांबाबत नाराजी

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतून दिल्लीतील सातपैकी तीन जागा काँग्रेस लढवत असून, चार जागा आम आदमी पक्ष लढवत आहे. काँग्रेसने दोन ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप लवली यांनी पत्रकार परिषदेत केला. ईशान्य दिल्लीतून कन्हैय्याकुमार तर वायव्य दिल्लीतून उदित राज हे दोघेही बाहेरून आले असताना त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भाजपचा टोला

देश तोडण्याची भाषा बोलणाऱ्यांबरोबर कोणीही राहू शकत नाही हेच लवली यांच्या राजीनाम्याने सिद्ध झाल्याचा टोला भाजपचे दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी लगावला आहे. तर हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली आहे.