Video : नदीत बुडणाऱ्या ६ वर्षांच्या मुलीचे तरुणाने असे वाचवले प्राण

हा व्हिडियो चीनमधील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या तरुणाच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

चीनमध्ये एका लहान मुलीचे पाण्यात बुडताना प्राण वाचवल्याने एका डिलिव्हरी बॉयचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. एक लहानगी नदीच्या बाजूला जिन्यावर काहीतरी करत होती. इतक्यात तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. पोहता येत नसल्याने ती पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. त्याचवेळी नदीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तरुणाने पाण्यात उडी घेत तिचे प्राण वाचवले. नशीब बलवत्तर असल्याने ती या अपघातातून बचावली. ही लहान मुलगी पाण्यात उतरुन एकटीच काहीतरी करत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. त्यावेळी काठावर आणखी एक लहान मूल असल्याचेही व्हिडियोमध्ये दिसत आहे. ही लहान मुलगी एकाएकी ती पाण्यात पडते. त्यावेळी बाईकवरुन जाणारा एक तरुण तिला बुडताना पाहतो, आपली बाईक जागच्या जागी थांबवतो आणि कसलाच विचार न करता थेट पाण्यात उडी मारुन तिला कडेवर घेऊन बाहेर काढतो.

या चिमुकलीचा जीव वाचवल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. हा तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून त्याचे नाव लिंगफेंग असे आहे. २३ वर्षाच्या या तरुणाने केलेले धाडस कॅमेरात कैद झाले आहे. हा व्हिडियो चीनमधील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या तरुणाच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. इतकेच नाही तर या मुलीला बाहेर काढल्यानंतर आपले बूट पाण्यात पडल्याचे ती सांगते. ते बूट काढण्यासाठीही तो परत पाण्यात जातो आणि तिचा पाण्यात पडलेला बूट घेऊन येतो. त्याच्या व्हिडियोला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्याच्या याच कामाची दखल घेत त्याच्या कंपनीकडून त्याला विशेष बक्षीसही जाहीर करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delivery boys prompt reaction saves six year old girl life from water in china

ताज्या बातम्या