Republic Day 2017 : ‘येथे’ पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन

१९५५ नंतर संचलन सोहळ्याचे आयोजन राजपथावर

प्रजासत्ताक दिनाचा संचलन सोहळा इर्विन स्टेडियम, लाल किल्ला, राम लिला मैदान अशा विविध ठिकाणी १९५० ते १९५४ च्या काळात आयोजीत करण्यात आला होता.( छाया सौजन्य : getty image)

भारताचा ६८ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा केला आहे. दिल्लीतील राजपथावर दिमाखात संचलन सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. भारतीय संस्कृती, लोकशाहीची ताकद, भारतीय सैन्य, हवाईदल आणि वायूदलाच्या कवायती, विविध राज्यांचे चित्ररथ अशा दिमाखदार सोहळ्यात राजपथावर हा दिमाखदार आणि डोळे दिपवणारा सोहळा पार पडतो. राजपथावरचे हे संचलन या दिवशीचे खास आकर्षण असते. या सोहळ्याची परंपरा १९५० पासून सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन कुठे पार पडले? याचे उत्तर राजपथ नक्कीच नाही. तर प्रजासत्ताक दिनाचे पहिले संचलन नॅशनल स्टेडियम येथे पार पडले होते.

Happy Republic Day 2017: देशवासीयांना द्या ‘प्रजासत्ताक दिना’च्या शुभेच्छा..

बीबीसीने दिलेल्या माहिनुसार प्रजासत्ताक दिनाचे पहिले संचलन त्याकाळच्या इर्विन स्टेडियमध्ये पार पडले होते. हा सोहळा इर्विन स्टेडियम, लाल किल्ला, राम लिला मैदान अशा विविध ठिकाणी १९५० ते १९५४ च्या काळात आयोजीत करण्यात आला होता. १९५५ नंतर या संचलन सोहळ्याचे आयोजन राजपथावर करण्यात आले. १९५० मध्ये इर्विन स्टेडियम येथे पार पाडलेल्या या सोहळ्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा पाहण्यासाठी त्यावेळी इर्विन स्टेडियमवर १५ हजार देशवासीय उपस्थित होते. यावेळी या संचलनात सैन्य, वायू आणि नौदाचा सहभाग होता आणि सेनेचे सात बँड होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांनी उपस्थिती लावली होती.

वाचा : तिरंग्याच्या रंगात रंगली जगातील सर्वात उंच इमारत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Did you know first republic day parade held in national stadium india