सध्या दिवाळीशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही महिलांनी घरासमोर काढलेल्या सुंदर रांगोळीचे आहेत कर काही लोकांनी केलेल्या विद्यूत रोषणाईचे आहेत. मात्र यापेक्षा सर्वात जास्त व्हिडीओ आहेत ते फटाखे फोडतानाचे. खरं तर, काही लोक दिवळीचा उत्सव साजरा करण्यासाठी स्वत:ची योग्य ती काळजी घेऊन फटाके फोडतात. पण काही लोक खूप धोकादायक पद्धतीने फटाके फोडतात जे पाहिल्यानंतर आपल्याही अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण जमिनीवर नव्हे तर चक्क स्वत:च्या अंगावर फटाखा ठेवून तो पेटवताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणाने चक्क पॅंटमध्ये पाऊस (फटाक्याचा एक प्रकार) अडकवल्याचं दिसत आहे. त्याने हा फटाखा पॅंटमध्ये अडकवतो आणि त्यानंतर त्याचा एक मित्र तो पेटवतो. त्याननंतर लगेच त्यातून आगीच्या ठिणग्या निघायला सुरुवात होते. शिवाय या ठिगण्या निघताना त्याच्या शरीराला आग लागतेय की काय असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडला आहे. मात्र हा तरुण अजिबात घाबरत नाहीये, तो हा फटाखा पेटल तसा तो गोलगोल फिरत त्याचा आनंद लुटताना दिसत आहे, जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

job application from blinkit viral photo
पट्ठ्याने Blinkit चा वापर चक्क नोकरी मिळवण्यासाठी केला! सोशल मीडियावर ‘हा’ Photo होतोय व्हायरल…
Funny Slogan Written Behind Indian Trucks mothers love photo Goes Viral
“कितीही मोठे झालो तरी…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; PHOTO पाहून कराल कौतुक
chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे

हेही पाहा- शाळकरी मुलाने जुगाड करून बनवली सायकलवर चालणारी वॉशिंग मशीन; Video पाहून युजर्स म्हणाले, भविष्यात…!

व्हिडिओसाठी जिवघेणा स्टंट –

व्हिडीओतील तरुणाने केवळ रील शूट करुन ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी हा धोकादायक स्टंट करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी सध्याचे तरुण काहीही करायला तयार असतात अशा प्रतिक्रिया काही नेटकरी देत आहेत. तर अनेकजण हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करत आहेत. कारण या तरुणाने स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घातल्याचं ते म्हणत आहेत. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिलं की, “न्यायालयाच्या फटाखे न फोडण्याच्या आदेशाचा निषेध करण्याचा यापेक्षा दुसरा मार्ग असू शकत नाही.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “खतरों के खिलाडीमधील हा पुढचा स्पर्धक आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “हे धोकादायक आहे कारण पाऊस कधीही फुटू शकतो.”