Viral Video : सोशल मीडियावर नवनवीन रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी भेंडी समोसा तर कधी कोल्ड्रींक पाणीपुरी, कधी मॅगीचे भजे तर कधी गुलाबी बिर्याणी यासारखे अनेक नवनवीन पदार्थ चर्चेत येत असतात. काही पदार्थांचे नाव तर काही पदार्थांच्या रेसिपी पाहून आपण अवाक् होतो. सध्या असाच एक पदार्थाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा पदार्थ काही लोक आज पहिल्यांदा ऐकलीत किंवा वाचतील. तुम्ही कधी वांग्याची भजी खाल्ली आहे का? हो, वांग्याची भजी. तुम्हाला प्रश्न पडला असेल ती वांग्याची भजी कशी बनवतात, तर त्यासाठी तु्म्हाला हा हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या गाड्यावर वांगी भजी बनवताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गाडा चालवणारा तरुण दिसेल. तो वांगी भजी बनवताना दिसत आहे. सुरुवातीला त्याने भरली वांग्याप्रमाणे वांग्याचे चार काप केले आणि ही वांगी गरम तेलातून तळून घेतली. त्यानंतर या तळलेल्या वांग्याला भिजवलेल्या बेसनाच्या पीठात बुडवून तेलातून पुन्हा काढली. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तळलेली वांगी हा तरुण एका प्लेटमध्ये हिरव्या मिरचीसह सर्व्ह करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांनी ही आगळी वेगळी रेसिपी पहिल्यांदाच पाहिली असेल.

हेही वाचा : पुण्यात सर्वात श्रीमंत कोण आहे? नेटकऱ्यांनी एकच नाव घेत केला कमेंट्सचा वर्षाव

foodexplorerlalit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वांग्याची भजी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांना ही हटके रेसिपी आवडली आहे तर काही लोक ही रेसिपी पाहून अवाक् झाले आहे. एका युजरने लिहिलेय, “वांगी भजी बनवली आहे तर आता लिंबू, शिमला मिरची, मॅगी, कोल्ड ड्रिंक, चिप्स, पॉपकॉर्न, बिस्किट, आइस्क्रिम सर्वांचे भजी बनवा. नवीन ट्रेंड येणार कुकींगचा” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “इस देश का यारो क्या कहना”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you ever eat wangi bhaji a young man sell wangi bhajji watch video of recipe ndj
First published on: 21-03-2024 at 20:53 IST