ढिंच्याक पूजा मागच्या काही दिवसात चांगलीच गाजत आहे. ‘सेल्फी मैने लेली आज’ हे तिचे गाणे सध्या इंटरनेटवर भलतंच हीट होतंय. तिचा या गाण्याचा व्हिडिओ यूट्युबवर भलताच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांची सख्या भारतात मोठ्याप्रमाणात आहे. आतापर्यंत १४ कोटी जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पण कमी कालावधीत इतकी प्रसिद्धी मिळविणाऱ्या ढिंच्याक पूजाची महिन्याची कमाई किती आहे माहितीय?

ट्विटर आणि फेसबुकवरही तिच्या गाण्यांना मोठी पसंती मिळत असून यामुळे तिच्या अर्थिक उत्पन्नात मोठी भर पडत असल्याचे चित्र आहे. नुकतेच क्वोरा या साईटने तिच्या उत्त्पन्नाबाबत सर्व्हे केला. तिच्या उत्पन्नाचे आकडे ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. याशिवाय तिचे ‘स्वॅग वाली टोपी’ आणि ‘दारु इन हर किटी’ ही गाणीही भन्नाट गाजत असून या गाण्यांवरुन तिच्या कामाचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.

contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
article about income tax reforms in india
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी..
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”

ढिंच्याक पूजाच्या कमाईबाबत योगेश मालीवाडने काही समीकरणे मांडली आहेत. तो म्हणतो, पूजा १० ते १५ हजार डॉलर्स मिळवते. गुगलवरुन तिच्या गाण्यांना मिळणाऱ्या जाहिरातींवर ही गणिते अवलंबून असतात. याशिवाय तिच्या गाण्यांना किती जण क्लिक करतात यावरही ही समीकरणे ठरतात. त्यामुळे तिचे उत्पन्न महिन्याला ३ लाख ते ५० लाख इतके असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

याशिवाय अंशुल खंडेलवाल यांच्या अंदाजानुसार, भारतात ढिंच्याक पूजाच्या गाण्यांना मिळणारी पसंती मोठी असली तरीही त्यातून मिळणारे उत्पन्न अतिशय कमी आहे. २४०० जणांनी तिचे गाणे पाहिले तर तिला २४ रूपये मिळतात. सध्या ती चांगलीच गाजत आहे. याचे कारण तिची हुशारी नसून तिच्यावर मोठ्या प्रमाणात मेमे निघत आहेत. तसेच ते इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत असे, त्यांनी सांगितले. तिच्या एकूण मिळकतीची नोंद घेतल्यास ती २ ते ४ लाख रूपये कमावते.