सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कुत्रा स्विमिंग पूलमध्ये पडताना दिसत आहे. अनेकदा आपण कुत्र्याला वाचवण्यासाठी मालक स्विमिंग पूलमध्ये उडी मारत असल्याचं पाहिलं आहे. मात्र यावेळी आसपास कुणीच नसल्याने दुसरा कुत्रा त्याच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्य असल्यासारखं तुम्हाला वाटेल. हा व्हिडीओ पाहताना अंगावर शहारा येतो. अखेर कुत्रा शर्थीचे प्रयत्न पाण्यात पडलेल्या मित्राला बाहेर काढण्यात यशस्वी होतो. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा स्विमिंग पूलच्या बाजूने जाताना दिसत आहे. अचानक पाय घसरल्याने तो स्विमिंग पूलमध्ये पडतो. यानंतर बाहेर निघण्यासाठी कुत्रा बरेच प्रयत्न करताना दिसतो. पोहून पुरता थकून जातो. त्याचा आवाज ऐकून दुसरा कुत्रा धावत त्याच्या मदतीला येतो. जवळपास ३४ मिनिटं हा प्रकार सुरु होता. अखेर दुसरा कुत्रा त्या कुत्र्याचं तोंड आणि मानेच्या मागच्या बाजूला पकडून त्याला खेचत बाहेर काढतो. हा संपूर्ण प्रकार घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. हा व्हिडीओ मालकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog save life of drowned doggy video viral on social media rmt
First published on: 28-01-2022 at 09:12 IST