आयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, राम मंदिरामध्ये प्रभु रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीच्या अगदी अगोदर, दूरदर्शनने जाहीर केले आहे की, अयोध्येतील मंदिरात दररोज होणाऱ्या राम लल्लाच्या आरतीचे थेट प्रक्षेपण करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी एक्सवर एका पोस्टमध्ये, दूरदर्शनने सांगितले की, “डीडी नॅशनल दररोज सकाळी ६.३० वाजता होणारी राम लल्लाची ‘आरती’ थेट प्रसारित करणार आहे.

त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “प्रभू रामाच्या भक्तांची अपार श्रद्धा लक्षात घेऊन ही “सुविधा दिली जाणार आहे. “आता, तुम्हाला दररोज घरबसल्या प्रभु श्री रामाचे दर्शन घेता येईल,” ठाकूर यांनी X वर पोस्ट केले, “राम भक्तांची भगवान श्री रामावरील अपार श्रद्धा लक्षात घेऊन, प्रसार भारतीने हे सुरू केले आहे. ही खूप मोठी सुविधा आहे.”

हेही वाचा – चक्क नवरीने भरले नवऱ्याच्या भांगेत कुंकू! Viral Video पाहून नेटकरी चक्रावले , म्हणाले…..

दुरदर्शवर दररोज धार्मिक कार्यक्रम प्रसारित करण्यामागील तर्काबद्दल द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले, दूरदर्शनवर वेळोवेळी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दिनदर्शिकेनुसार कार्यक्रम चालवले जातात.

अयोध्येतील राम मंदिरातून दररोज सकाळी ३० मिनिटांसाठी सकाळची आरती प्रसारित करण्याच्या विशिष्ट निर्णयाबाबत द्विवेदी म्हणाले: “आता, रामनवमी जवळ आली आहे आणि राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, आरती प्रसारित करण्याची हीच योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटले, या दृष्टीकोनामुळे आम्ही (श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र) ट्रस्टला त्यासाठी विनंती केली आणि त्यांनी संमती दिली. सुरुवातीला प्रसार भारती काही महिन्यांसाठी “मंगल आरती” प्रसारित करेल आणि नंतर ती पुढे कशी न्यावी यावर राम मंदिर ट्रस्ट निर्णय घेईल.

हेही वाचा – दिल्लीमध्ये मुंबईचा वडापाव विकते ही तरुणी; ग्राहकांची लागते रांग तरीही, का आली तिच्यावर रडण्याची वेळ? Video Viral

“लोक राम मंदिराशी जोडण्यास उत्सुक आहेत कारण त्याच्या भव्य उद्घाटनाला दोन महिने झाले आहेत, आणि प्रत्येकला मंदिराला भेट येऊन प्रार्थना करणे शक्य नाही. त्यामुळे ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. DD च्या YouTube चॅनेलवर एकाच वेळी प्रसारित केले जात आहे.पण, ट्रस्टकडे थेट प्रक्षेपणासाठी आत्तापर्यंत लॉजिस्टिक व्यवस्था नसल्यामुळे “डीडी दैनंदिन विधीच्या कव्हरेजसाठी मंदिराच्या आवारात दोन-तीन सदस्य टीमची नेमणुक करणार आहे.” असे दुरदर्शनच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले

“खरेतर, बऱ्याच वर्षांपूर्वी व्हॅटिकनमधील ख्रिसमस मासचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते. सांस्कृतिक दिनदर्शिकेच्या पूर्ततेबरोबरच प्रेक्षकांच्या आवडीच्या आधारावर आशय निश्चित केला जातो.: असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doordarshan to telecast live aarti from ayodhya snk
First published on: 14-03-2024 at 11:00 IST