लॉकडाउनमध्ये घरातच रहावं लागल्याने फावल्या वेळेत काय करावं असा यक्षप्रश्‍न अनेकांना पडला होता. नेटिझन्सने रिकाम्या वेळेचा उपयुक्त वापर करीत जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू केलं. काही जणांनी वेगवेगळे छंद जोपासण्यास सुरूवात केली. पण एका अकरा वर्षीय मुलीने असं काही करून दाखवलंय जे पाहून पाहून सर्वच जणं तिचं कौतुक करू लागले आहेत. लॉकडाउनमध्ये अनेक लहान मुलं ही एक तर मोबाईलमध्ये रमलेले दिसून येत होते किंवा मग एखादा व्हिडीओ गेम खेळताना दिसून येत होते. पण ११ वर्षीय मान्या हर्ष ही चिमुरडी मात्र भाज्यांच्या सालीपासून इकोफ्रेंडली पेपर तयार करून दाखवलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण अनेकदा फळ आणि भाज्यांची साल कचरा समजून फेकून देतो. पण याच भाज्यांच्या सालींचा वापर करत तिने इकोफ्रेंडली पेपर तयार करून दाखवलाय. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या फावल्या वेळेचा उपयोग करत या चिमुरडीने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. ११ वर्षीय मान्या हर्ष ही बंगळुरमध्ये राहणारी आहे. घरात कचरा म्हणून निघालेल्या केवळ १० कांद्याच्या सालीचा वापर करत तिने हे दोन ए-४ आकाराचे इकोफ्रेंडली पेपर तयार केले आहेत. सुरूवातीला पेपर तयार करण्याचा तिचा पहिला प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला. परंतु जोपर्यंत तिला वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रकारचे कागद बनवण्यात यश मिळत नाही तोपर्यंत तिने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर तिच्या बऱ्याच प्रयत्नानंतर इकोफ्रेंडली कागद तयार करण्यात यश मिळाले. तिच्या या कामगिरीची दखल संयुक्त राष्ट्र जलने देखील घेतली आहे.

आणखी वाचा : VIDEO : कोलांटी उडी घेत शॉर्ट्स घालण्याचा तरुणाचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल!
झाडांची होणारी कत्तल पाहून ११ वर्षीय मान्या हर्ष हिला वाईट वाटायचं. पृथ्वी आपली आई आहे आणि तिचं संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. आपल्या डोळ्यांसमोर होणारी वृक्षांची कत्तल पाहून तिने सुरूवातीला लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं. आपण म्हणतो, वय फक्त एक संख्या असते, पण पेनची ताकद ही तलवारीपेक्षाही जास्त धारदार असते. अगदी त्याप्रमाणे तिने ‘निसर्ग वाचवणे’ आणि ‘प्रदूषण थांबवणे’ याविषयी कविता लिहिण्यास सुरुवात केली. अशात तिचे एकूण पाच पुस्तके प्रकाशित झाले असून कवळ्या वयात ती निसर्गाच्या विषयावरील लेखिका बनली.

आणखी वाचा: OMG! चक्क हातानंच उचललं मधमाशांचं पोळं! नेटिझन्स व्हिडीओ पाहून झाले अवाक्!

मान्याला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी Earth.org India Network कडून ‘Rising of India’ ही पदवी मिळाली आहे. मान्याचे आई -वडील चित्रश्री आणि हर्ष बीएस हे दोघेही तिला निसर्ग संवर्धनासाठी प्रोत्साहित करत असतात. मान्या हिने नारळाच्या करवंटीचा भूसा, हिरव्या वाटाण्यांची सालं, जुन्या जीन्सपासूनही कागद तयार केले आहेत. तसंच घरातील जुन्या वर्तमानपत्रांच्या मदतीने हॅंडबॅंग देखील तयार करून ते लोकांना वापरण्यासाठी आवाहन करत असते.

लोकांनाही असे इकोफ्रेंडली कागद बनवता यावेत यासाठी तिने मेकींगचे काही व्हिडीओज देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे हे व्हिडीओज पाहून अनेक लोकांनी सुद्धा घरी इकोफ्रेंडली कागद आणि पिशव्या तयार करण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर #vegetablepaper हा हॅशटॅग देत इकोफ्रेंडली कागद आणि पिशव्यांचे फोटोज शेअर करत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco warrior is turning vegetable waste into paper prp
First published on: 11-09-2021 at 11:45 IST