टेस्ला अर्थात स्पेसएक्स ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. या कंपनीने सी.ई.ओ एलोन मस्क याचं एक ट्विट क्रिप्टो करन्सीच्या मार्केटमध्ये भूकंप घडवून आणण्यासाठी पुरेसे आहे. एलन मस्क यांनी असं खूप वेळा केलही आहे. आता नुकतच पुन्हा एकदा त्यांनी तसेच केले आहे. मस्क यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवरचा फोटो बदलला आणि डॉजकॉइनच्या किंमती सोमवारी वाढली.

काय होत असं त्या फोटोमध्ये?

अपडेट केलेल्या फोटोमध्ये मस्क यांनी गॉगल घातला आहे. त्या गॉगलवरती डॉगच्या फोटोचं प्रतिबिंब दिसत आहे. ते प्रतिबिंब नीट बघितलं तर त्यात डॉजकॉइनच प्रतिक Shiba Inu दिसत आहे. यामुळेच सोमवारी क्रिप्टो करन्सीची किंमतीमध्ये मोठी उडी दिसली. या आधी त्यांनी एका ट्विटर वरती एका रिप्लाय ट्विटमध्ये लिहल होत की, त्यांच्या मुलाने डोगेला एखाद्या चॅम्पियनप्रमाणे पकडलं आहे. ते म्हणतात, ‘लिटल एक्सने डोगला  चॅम्पियनसारखे धरून ठेवले आहे. मी ‘विकणे’ हा शब्द एकदाही म्हटले नाही.

याआधीसुद्धा केला आहे सपोर्ट

हे प्रथमच नाही जेव्हा मस्क यांनी डॉजकॉइनचा उल्लेख केला आहे. अनेकवेळा मस्क यांनी  आहेत जेव्हा  डॉजकॉइनबद्दल सोशल मीडियावर मिम्स शेअर केले आहेत आणि त्यामुळे डॉजकॉइनच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. क्रिप्टोकरन्सींच्या किंमतीत नुकत्याच झालेल्या घटनेमुळे गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. तथापि, डॉजकॉइनचा पाठिंब्याने डॉजकॉइनचा गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला पाहिजे. डॉजकॉइनची सुरुवात एक विनोद म्हणून झाली होती परंतु यामुळे गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा मिळाला आहे.

जगातील दुसरा श्रीमंत माणूस

ब्लूमबर्ग अब्ज अब्जाधीश निर्देशांकानुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत एलोन मस्क अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याची एकूण संपत्ती १८१ अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती ११.३ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे मस्क याचं नेटवर्थ वाढली आहे. वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी बेजोसलाही मागे सोडले होते.