जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सह-संस्थापक इलॉन मस्क यांची पूर्व प्रेयसी जेनिफर ग्वेन (Jennifer Gwynne) हिने त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासूनचे काही जुने फोटो लिलावासाठी ठेवले होते. जेनिफर आणि मस्क १९९४-९५ च्या आसपास पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात एकत्र शिकत असताना जवळपास वर्षभर रिलेशनशिपमध्ये होते. त्या वेळचे काही दूर्मिळ फोटो आणि भेटवस्तू जेनिफरने लिलावासाठी ठेवल्या होत्या. आता या लिलावातून तिला मोठी रक्कम मिळाली आहे.

जेनिफरने द बोस्टन ग्लोबला सांगितले की तिने टेस्ट पेपरच्या लिलावाबद्दल वाचले आणि तिला लक्षात आले की तिच्याकडे विकण्यायोग्य अनेक वस्तू आहेत. यामध्ये छायाचित्रे, तिचे वाढदिवसाचे कार्ड आणि हार यांचा समावेश आहे. मस्क आणि जेनिफरच्या या छायाचित्रांचा १.६५ लाख डॉलर्समध्ये लिलाव झाला. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम १.३ कोटी रुपये इतकी आहे. मस्क आणि जेनिफर १९९४ ते १९९५ दरम्यान एकत्र होते. त्या दिवसांत दोघेही पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात शिकत होते. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार या लिलावात एकूण १८ फोटो होते आणि प्रत्येक फोटो स्वतंत्रपणे विकला गेला.

प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानंतर तिला मनवण्यासाठी मुलानं केलं असं काही… Viral Video पाहून आवरणार नाही हसू

ग्वेन आणि मस्क सध्या संपर्कात नाहीत. मस्कने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर दोघे वेगळे झाले. त्यानंतर मस्क कॅलिफोर्नियाला गेले. ग्वेनने सांगितले की मस्क फोनवर बोलू शकत नाही कारण त्यांना हे वेळ वाया घालवल्यासारखे वाटते.

१९९४ मध्ये मस्कने ग्वेनला तिच्या वाढदिवशी भेट दिलेला एक सोन्याचा लहान हार लिलावात ५१ हजार डॉलरमध्ये विकला गेला. मस्क आणि ग्वेनचा एक फोटो ४२ हजार डॉलरमध्ये विकला गेला. मस्कने ग्वेनला बू-बू म्हणत वाढदिवसाच्या कार्डावर स्वाक्षरी केली होती, जी सुमारे १७ हजार डॉलरमध्ये विकली गेली. ग्वेन आता दक्षिण कॅरोलिनामध्ये राहते. तिने सांगितले की ती तिच्या सावत्र मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी काही पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहे.