सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला थक्क करणारे असतात. तर काही आपणाला पोट धरुन हसायला लावणारे असतात. पण काही काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओत एक धोकादायक साप आणि माकड एकाच झाडावर बसल्याचं दिसत आहे. खरं तर सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात पण या व्हिडीओत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

सापाच्या समोर कोणी आलं तर साप त्याला सोडणार नाही, हे जसं आपल्याला माहिती आहे तसंच ते प्राण्यांनादेखील माहिती असतं. त्यामुळेच सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात. पण या व्हिडीओतील माकड मात्र तसं करत नाहीये. हे माकड झाडावर बसून काहीतरी खाण्यात मग्न असल्याचं दिसत आहे. यावेळी त्याच्या जवळ एक साप येतो तरीही ते माकड बिनधास्तपणे आणि न घाबरता झाडावर बसल्याचं दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी माकड सापाला आपल्या हातात धरुन बाजूला ढकलत असल्याचंही पाहायला मिळत आहे. माकडाने त्याला काही त्रास दिला नाही पण साप मात्र त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळीही माकड खायचं थांबवत नाही. शिवाय त्याला चावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापालाही तो दूर करण्याचा करत नाही. त्यामुळे विषारी साप दंश करण्याचा प्रयत्न करत असतानाही हे माकडं इतकं शांत कसं राहू शकतं? असा प्रश्न अनाकांना पडला आहे. शिवाय अनेकांनी हे माकड खूप धाडसी असल्याचं म्हटलं आहे.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

माकडाचा आणि सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत जवळपास ६ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “माकडाची शांतता पाहून वाटतं आहे की, कदाचित तो शेवटचं खाऊन घेत आहे.” तर आणखी एकाने लिहिलं “माकड खूप आळशी आहे.”