आतापर्यंत तुम्ही मौल्यावान वस्तू, दागिने, पैसे, गाड्या चोरींच्या अनेक बातम्या वाचल्या असतील तेही जाऊ द्या काही चिंधी चोर तर देवळाबाहेर काढलेल्या चपलांवर देखील डल्ला मारतात. किरणा मालापासून ते कपडे चोरीपर्यंतच्याही अनेक छोट्या मोठ्या बातम्या आपण वर्तमानपत्र वेगवेगळ्या साईट्वर वाचत असतो त्यामुळे अशा वस्तूंची चोरी होणे काही नवीन नाही पण नोएडा पोलिसांसमोर आता नवीन डोकेदुखी समोर आली आहे. कारण येथे पिझ्झा चोरीचे प्रकरण समोर आले आहेत. पिझ्झा डिलिव्हरी बॉईजकडून हमखास पिझ्झा चोरून नेण्याच्या घटना या भागात वाढत चालल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : १५ वेळा अपयशी ठरलेले ‘हे’ बाबा यंदा तरी निवडणूक जिंकणार का?

साखळी चोरी किंवा पैसे, पर्स चोरणे अशा छोट्या मोठ्या चो-या नोएडा पोलिसांसाठी काही नव्या नाहीत अशा चोरीच्या अनेक घटना येथे घडतात. पण सध्या या भागात चक्क पिझ्झाची चोरी होऊ लागली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार दर आठवड्याला पिझ्झा चोरीच्या येथे चार पाच घटना घडतात असे म्हटले आहे. या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एका पिझ्झा डिलिव्हरी बॉईजने सांगितले की हल्ली पिझ्झांची येथे सर्रास चोरी केली जाते. एका वेळी तीन ते चार पिझ्झा चोरांकडून चोरले जातात असेही त्यांनी सांगितले. पण फक्त पिझ्झा आहे म्हणून ते अनेकदा तक्रार करणे टाळतात. त्यामुळे आपले बरेच नुकसान होत असल्याची खंतीही त्यांनी बोलून दाखवली.

VIRAL: फाटका कुर्ता घालतो म्हणणाऱ्या राहुल गांधींची सोशल मीडियावर उडवली खिल्ली

चोर तोंडावर रुमाल बांधून किंवा हेल्मेट घालून येतात आणि पिझ्झाची चोरी करून नेतात असेही त्यांनी सांगितले. कॉलेज परिसरात ही चोरी अधिक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. नोएडाच्या सेक्टर ५८ आणि सेक्टर ६२ मध्ये ही चोरी अधिक होते. यापूर्वीही पिझ्झा चोरण्याचे अनेक प्रकार घडायचे पण पिझ्झाची मुळात चोरी होते यावरच कोणी विश्वास ठेवायचे नाही त्यामुळे आम्हालाच ओरडा पडायाचा असेही अनेक डिलिव्हरी बॉईजने सांगितले. पण आता अनेक डिलिव्हरी बॉईजना अशा चोरीचे अनुभव बऱ्याचदा आले आहेत त्यामुळे चोरांपासून आपला पिझ्झा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना खूपच कसरत करावी लागत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every week more than dozen of pizzas stolen in noida
First published on: 18-01-2017 at 12:53 IST