भारताचा आक्रमक कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी कायम चर्चेत असते. ‘हॉट अँड फिट’ कपल म्हणून ते ओळखले जातात. लॉकडाउन काळात विराट आणि अनुष्का आपल्या मुंबईच्या घरात एकत्र होते. त्यांनी एकमेकांसोबत छान वेळ घालवला. आपण लॉकडाउनमध्ये काय करतोय हे वेळोवेळी त्यांनी छानसे फोटो पोस्ट करून चाहत्यांना सांगितलं. पण गेले काही दिवस विराट आणि अनुष्का यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत अनुष्का गरोदर असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट किंवा अनुष्का कोणीही ही ‘गोड’ बातमी दिलेली नाही, तरीदेखील असा फोटो फिरत आहे. त्यावर अधिक माहिती मिळवताना हा फोटो खरा आहे की खोटा आहे हे समोर आले.

जाणून घ्या सत्य

विराट कोहली आणि त्याच्या सोबत गरोदर अनुष्का असा एक फोटो काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचा हा फोटो खरा आहे की त्यात काही गौडबंगाल आहे याची चर्चा अनेक ठिकाणी रंगलेली सध्या दिसते. त्यावर अधिक माहिती घेता हा फोटो खोटा म्हणजेच एडिटेड असल्याचे निष्पन्न झाले. हा खरा फोटो वेगळाच असून त्या फोटोत दोन चेहरे बदलण्यात आले आहेत. त्या फोटोतील असणारी खरी दोन माणसंदेखील तितकीच परिचयाची आणि लोकप्रिय आहेत. हा खरा फोटो बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांचा आहे.

जेनेलिया गरोदर असताना रितेश-जेनेलियाने एक फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटमशील हा फोटो आहे. काही अतिउत्साही लोकांनी मात्र त्या फोटोतील चेहरे बदलून त्यावर विराट-अनुष्काचे चेहरे त्यावर एडिट केले आहे. त्यामुळे विराट-अनुष्काकडे सध्या तरी गोड बातमी नाही हे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check what is the truth behind the photo of pregnant anushka sharma vjb
First published on: 24-06-2020 at 09:20 IST