Father Beat Son Video Viral : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात, तर काही फार धक्कादायक असतात. अशातच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात परीक्षेत नापास झाल्याने वडील आपल्या मुलाला भररस्त्यात पट्ट्याने झोडपताना दिसतायत. त्यानंतर त्यांच्या या मारहाणीला मुलगा ज्या प्रकारे प्रतिकार करतोय, ते फारच भयंकर आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सही शॉक झालेत. अनेकांनी मुलावर पालकांनी केलेल्या संस्कारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा आणि वडील भररस्त्यात उभे आहेत. वडील हातात पट्टा घेऊन अतिशय रागावल्याचे दिसत आहेत. पुढच्या क्षणी ते मुलाला त्या पट्ट्याने मारण्यास सुरुवात करतात. त्याची रस्त्यावर ठेवलेली शाळेची बॅग उचलतात आणि रस्त्याच्या कडेला फेकून देतात. परीक्षेत नापास झाल्याने वडील आपल्या मुलाला मारत होते, असे यात सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडील मारत असताना मुलगाही प्रत्युत्तरादाखल त्यांना हातात काठी घेऊन मारू लागतो.
सोसायटीच्या आवारात वडील त्याला मारू लागतात; पण यावेळी तो धावत रस्त्यावर पळतो आणि रस्त्याच्या मधोमध दोघांचीही मारामारी सुरू होते. वडील पट्ट्याने त्याला मारण्याचा प्रयत्न करतात; पण तो त्यांच्यापासून सतत दूर दूर पळण्याचा प्रयत्न करतो. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांकडून पट्ट्याचा मार बसताच मुलगाही त्यांना काठीने मारू लागतो. भररस्त्यात त्यांच्या मारामारीचा हा प्रकार सुरू असतो. मुलगा वडिलांना खूप पळवतो. अखेर एक व्यक्ती त्याला पकडते आणि त्याला वडिलांच्या स्वाधीन करते. त्यानंतर वडील मुलाला निर्दयीपणे मारहाण करू लागतात. हे दृश्य पाहून लोकांनाही धक्का बसला आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @asianswithattitudes नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर लोक वडिलांच्या वर्तनाचा तीव्र निषेध करीत आहेत. एका युजरने कमेंट केली की, इथे पालकांचे संस्कार कमी पडत आहेत. दुसऱ्याने म्हटले की, कोणी प्राण्यांनाही अशा प्रकारे मारहाण करीत नाही. तिसऱ्याने लिहिले की, मुलाला बोलून समजावू शकता; पण हा मार्ग योग्य नाही.