scorecardresearch

Premium

वडिलांच्याच राज्यात मुलगी राज्य करते; बाप-लेकीच्या नात्याचा सुंदर VIDEO होतोय व्हायरल

Viral video: म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. याचाच प्रत्यय देणाऱ्या एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय

Father daughter love Heartwarming Viral Video Wins Hearts
बाप-लेकीच्या नात्याचा सुंदर VIDEO होतोय व्हायरल

Father daughter love: बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर.बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही.

याचाच प्रत्यय देणाऱ्या एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.सोशल मीडियावर बाप-लेकीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. वडिलांच्या राज्यात मुलगी राज्य करते, याचंच उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. पाहून तुमचं मन खूष होऊन जाईल

What is millet milk
मिलेट्स दूध म्हणजे काय? रोजच्या आहारात सेवन करू शकता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे
Marco Troper death
यूट्यूबच्या माजी सीईओंच्या मुलाचा वसतीगृहात आढळला मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
Loksatta chaturanga Governor Ramesh Bais Consider changing school timings
शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?

मुलगी ही खूप नशिबान लोकांच्या घरात जन्माला येते. लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या वडिलांच्या गाडीवर बिनधास्तपणे बसली आहे. एरवी गाडीवर एकटी बसायला घाबरणारी ती वडिलांच्या मागे बिनधास्त बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. यावेळी ती गाडीवर उलटी बसली आहे आणि आजूबाजूचा परिसर, धावती झाडे, गाड्या यांचं निरिक्षण करत आपल्याच विश्वात रमली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना वडिलांची आणि त्यांच्या लहानपणीची आठवण येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका! चतुर मगरीनं कासवाची क्षणात केली शिकार; हल्ल्याचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ ankahe_al_fazz नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्या आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना एक सुंदर कॅप्शन देखील लिहिलीय. “हा आनंद महागड्या कारपेक्षा मोठा आहे” असं कॅप्शन देण्यात आलंय. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडू लागलाय. आत्तापर्यंत या व्हिडीओला ७१ हजार लाईक्स मिळाले आहेत. तसंच बाप-लेकीचे प्रेम पाहून यूजर्स भावूक झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father daughter love heartwarming viral video wins hearts srk

First published on: 06-12-2023 at 12:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×