फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. तरुणाई या महिन्यातल्या व्हॅलेंटाईन डेची वाट पाहत असते. त्यानिमित्त बाजारपेठही सजलेली असते. आपल्या प्रियकर प्रेयसीजवळ प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. आता जर तुमच्या महाविद्यालयानेच हा दिवस साजरा करण्याची परवानगी दिली तर? व्हॅलेंटाईन डे दिवशी महाविद्यालयात आपल्या प्रियकर-प्रेयसीसोबत येण्याची सक्ती केली तर?

कॅम्पसमध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनला परवानगी देणारं एक परिपत्रक जाधवपूर विद्यापीठ प्राधिकरणाने जारी केल्याचं दिसत आहे. यात विद्यार्थी आणि शिक्षकांना विद्यापीठाने कॅम्पसमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास परवानगी दिली आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे ‘प्रियकर- प्रेयसी’ शोधावे लागतील, असंही म्हटलं आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

धक्कादायक म्हणजे, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचा ‘बॉयफ्रेंड’ किंवा ‘गर्लफ्रेंड’ शोधण्याची मुदत देण्यात आली असून, १० फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकाने आपले नाव नोंदवायचे आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकावर विद्यापीठाच्या कुलसचिवांची सहीसुद्धा आहे. मात्र ही सही आणि हे पत्रक बनावट असल्याचं विद्यापीठ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे.

विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी या बनावट परिपत्रकाबाबत पोलीस आणि सायबर क्राईम विभागाला कळवले असून कुलसचिवांनीही या प्रकरणाची माहिती कुलगुरूंना दिली आहे. रजिस्ट्रार मंजू बसू म्हणाल्या, “हे अत्यंत दुर्दैवी आहे, पोलीस तपास करत आहेत आणि आम्हीही चौकशी करू. हे सहन केले जाऊ शकत नाही.” विद्यापीठानेही नोटीस बनावट असल्याचा उल्लेख करत निवेदन जारी केले आहे.