Puppy Rescued From Flood Video Viral: देशातील अनेक भागात मुसळधार पावासाने थैमान घातले असून नद्यांना पूर आलं आहे. उत्तर भारतात पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने पशु-पक्षांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं अनेकांच्या झोपा उडवल्या आहेत. कारण पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकाने जीवाची बाजी लावली. नदीला पूर आला असतानाही फायर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने सीडीच्या मदतीने पिल्लाला वाचवलं. हे थरारक दृष्य कॅमेरात कैद झालं असून व्हायरल झालेला व्हिडीओ चंदीगडचा असल्याचं समजते.

खुड्डा लाहौरा ब्रीजच्या खाली कुत्र्याचं पिल्लू अडकल्यानंतर फायर डिपार्टमेंटच्या टीमने या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नदीला पूर आलेला असतानाही या रेस्क्यू टीमने जीव धोक्यात टाकून पिल्लालं वाचवल्यानं सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. हा जबरदस्त व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून यूजर्स या व्हिडीओला पसंद करताना दिसत आहेत. ४४ सेकंदांचा हा रेस्क्यू व्हिडीओ आयपीएस अधिकारी श्रुती यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

Rashmika Mandana comment after watching the video
‘अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स VIDEO पाहून रश्मिका मंदानाही फिदा
a man swimming in rain water
Video : “अरे हा मासा नव्हे..!” पुण्यातील तरुणाने घेतला पावसाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद, रस्त्यावरील लोक पाहतच राहिले
Watch Passengers sleep near toilet on Chhattisgarh Express
“दरवाजा, शौचालय…जिथे जागा मिळाली तिथेच….”; छत्तीसगढ़ एक्सप्रेसची भयान स्थिती, Video Viral
Man Making Reel Crushed To Death By Elephant
रीलच्या नादात मृत्यूच्या दारात गेला; हत्तीनं चिरडलं अन् १५ सेकंदात झालेल्या वेदनादायक मृत्यूचा VIDEO व्हायरल
People Doing Vulgar Act Goes Viral In Amravati
अश्लील हावभाव, माता भगिनींवरुन शिवीगाळ अमरावतीतील Video व्हायरल; बदनामी मात्र यूपीची, खरं काय ते पाहा
Circumstances in life will teach you everything
“परिस्थिती सगळं शिकवते….”, भाजी नव्हती म्हणून चिमुकल्याने डब्यात भरली मीठ अन् मिरची, शाळकरी मुलाचा Video Viral
villagers dance on traditional song
गावाकडची माणसं! फक्त जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे; गावकऱ्यांनी सादर केले पारंपारिक नृत्य, व्हिडीओ एकदा पाहाच
Kangana Ranaut Viral Video
“कोणत्या गालावर मारलं..”, पत्रकाराने कंगना रणौत यांना लोकांमध्ये विचारला प्रश्न? Video चा हा अँगल चुकवू नका, Video
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा

नक्की वाचा – Video: ट्रॅफिक झाल्यामुळे पठ्ठ्याने सायरनचा केला गैरवापर, पोलिसांनी रुग्णवाहिका तपासली अन्…

इथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, खुड्डा लाहौरा पूलाखाली अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणारे फायरमॅन संदीप यांना सलाम. ज्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून पिल्लाला वाचवलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी फायरमनवर स्तुतीसुमने उधळली आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, या कठीण परिस्थितीत मुक्या प्राण्यांची मदत करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांचं मनापासून आभार. हा व्हिडीओ एसएसपी यूटी चंडीगढ या ट्वीटर हॅंडलवरूनही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९६ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर एक हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.