सोशल मीडियाच्या जगात लोकांना कधी आणि काय आवडेल याची कल्पना न केलेलीच बरी… सध्या सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमधली नवरी लग्नमंडप सोडून थेट जीममध्ये पोहोचली. या नवरीची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरूय. नववधूच्या वेशभूषेत सजलेल्या या नवरीचा जीममधला वर्कआऊट पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक करण्यास सुरूवात केलीय. हा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधूच्या वेशभूषेत ही नवरी जिममध्ये वर्कआऊट करतेय. विशेष बाब म्हणजे लग्नाच्या भरजरीच्या साडीत या नववधूने जड डंबेलही उचलले होते, जे पाहून सगळेच थक्क झाले. खरं तर ही नवरी जीममध्ये प्री-वेडिंगसाठी आली होती. या व्हिडीओमध्ये नववधू तिच्या लग्नाआधी डोल-शोले दाखवताना दिसत आहे. साधारणतः लग्नात नवरी सजून धजून एका खोलीत बसून नवरदेवाची वाट पाहताना पाहत आलो आहोत. पण लग्नाआधी जीममध्ये वर्कआऊट करणाऱ्या या नवरीची सोशल मीडियावर बरची चर्चा रंगलीय.

आणखी वाचा : Covid-19 Pandemic: WHO ने नवीन करोनाच्या नामकरणात ग्रीक वर्णमालेतील दोन अक्षरे का गाळली? Omicron नाव का दिलं? जाणून घ्या…

हा व्हिडीओ IPS रुपिन शर्माने यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. ‘प्री वेडिंग शूट, आज धाडसाचं गुपित उघडलं.’ अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. नवरीचा हा अनोखा स्वॅग नेटकऱ्यांच्या पसंतीला पडत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर अनेकांनी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक करत नवरीच्या व्हिडीओवर वेगवगेळ्या कमेंट्स करताना दिसून येत आहेत. बघूया कोण काय म्हणाले व्हिडीओबद्दल…

आणखी वाचा : VIRAL : महिलेची CISF जवानाला शिवीगाळ; थर्मल स्क्रिनिंगवरून बंगळुरू विमानतळावर घातला गोंधळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नात नवरीचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ काही युजर्स म्हणाले की, नववधूची स्टाईल खरोखरच अनोखी आहे. त्याचबरोबर ‘क्या टशन है भाई’ असंही काही युजर्स म्हणत आहेत.