इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे  राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. वय वर्षे ३९ असलेले मॅक्रॉन तरुण नेतृत्त्वापैकी एक आहेत. तरूण वयात नेपोलियननंतर या देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळू शकलेले मॅक्रॉन दुसरे. या नव्या राष्ट्राध्यक्षांबद्दल अनेकांना कुतूहल आहे. व्यवसायाने ते बँकर आहेत. पण त्यांची प्रेमकाहाणी इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. इमॅन्युएल आहेत ३९ वर्षांचे तर त्यांच्या पत्नीचे वय आहे ६४ वर्षे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इमॅन्युएल यांची पत्नी ब्रिजेट फ्रान्समधल्या एका श्रीमंत घराण्यातील. १९७४ साली त्यांचा अँड्रे नावाच्या एका बँकरशी विवाह झाला. त्यांना तीन मुलेही आहेत. ब्रिजेट ज्या शाळेत शिकवायच्या त्याच शाळेत इमॅन्युएल मॅक्रॉन शिकत होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ते आपल्याच शिक्षिकेच्या म्हणजेच ब्रिजेट यांच्या प्रेमात पडले. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ब्रिजेटची मुलगी लॉरेन्सही इमॅन्युएल मॅक्रॉनसोबत एकाच वर्गात शिकायची. इमॅन्युएलच्या कुटुंबियांना आणि शाळेतील इतरांनाही लॉरेन्स आणि इमॅन्युएल यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते असेच वाटायचे. पण इमॅन्युएल यांना मात्र ब्रिजेटच आवडत होत्या. इमॅन्युएल हे शाळेतील नाटकांत अभिनय करायचे त्यावेळी आपले लॉरेन्सवर नाही तर ब्रिजेटवर प्रेम असल्याची कबुली त्यांनी दिली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French presidential frontrunner emmanuel macron and his wife brigitte trogneux love story
First published on: 27-04-2017 at 13:38 IST