scorecardresearch

नवऱ्याला पाहून नवरी लाजली, वेडिंग शूटचा Video व्हायरल, नेटकरी म्हणाले, “सरकारी नोकरीची ताकद”

नेटकरी म्हणतात, “सरकारी नोकरीची ताकद खतरनाक असते”, पाहा नवरा-नवरीचा व्हायरल व्हिडीओ.

नवऱ्याला पाहून नवरी लाजली, वेडिंग शूटचा Video व्हायरल, नेटकरी म्हणाले, “सरकारी नोकरीची ताकद”
नवरा-नवरीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल – (Image-Instagram)

Groom And Bride Viral VIdeo : लग्न सराईचा सीजन सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर नवरा-नवरीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. डीजेच्या तालावर थिरकणारे कपल्स स्टेजवरही रोमॅंटिक होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. लग्नाच्या मंडपात हळदी समारंभातही नवरा-नवरी जबरदस्त ठुमके लगावताना दिसतात. पण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या नवरा-नवरीच्या या व्हिडीओची जास्तच चर्चा रंगू लागली आहे. कारण नवऱ्याला पाहून नवरी लाजली असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून शेकडो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे.

स्टेजवर नवरीला पाहून नवऱ्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं अन्….

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नवरा अतिशय साध्या पद्धतीने स्टेजवर उभा राहून कॅमेराकडे लक्ष देताना दिसत आहे. नवरा-नवरी एकमेकांना पाहून लाजत असल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. नवरा-नवरीचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. नवरा सरकारी नोकरी करणारा असू शकतो, त्यामुळे एक सुंदर मुलगी त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाली असेल. वरमाला घालण्यासाठी नवरा-नवरी स्टेजवर उभे असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबत वऱ्हाडी मंडळीही स्टेजवर उभे असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तसंच नवरीसोबत तिच्या कुटुंबातील माणसंही स्टेजवर उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचदरम्यान नवऱ्याचा एक मित्र स्टेजवर येऊन फोटो काढताना दिसत आहे. फोटोग्राफरला पाहून सर्वजण फोटो काढत असतात. त्यावेळी नवऱ्याने नवरीला पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं. नवरा इतका लाजला की नवरीला तो पाहतही नव्हता.

नक्की वाचा – ‘पतली कमरिया’ गाण्यावर थिरकली तरुणी, पण बुलेटच्या वजनामुळं झाली फजिती, Video पाहून पोट धरून हसाल

इथे पाहा व्हिडीओ

नवरा-नवरीच्या त्या व्हिडीओचीही चर्चा तुफान रंगली

सोशल मीडियावर अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. भर लग्नमंडपात नवरीने नवऱ्याला पाहुण्यांसमोर उभं केलं. त्यानंतर त्याच्या हातात गुलाबाचा फूल दिला. पाहुण्यांसमोर नवरीने उभं केल्यानंतर नवरा हळव्या मनाने हसत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. तर नवरीने नवऱ्याला सनी लियओनीचं लोकप्रिय गाणं ‘मेरे सइयां सुपरस्टार’ डेडिकेट करून भन्नाट डान्स केला. लिरिक्स सोबतच नवरी या गाण्यावर थिरकताना व्हिडीओत दिसत आहे. त्याचवेळी नवराही भर लग्नमंडपात लाजला असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ prabhatweddingvlogger नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 20:08 IST

संबंधित बातम्या