पुण्यातील धायरी भागात राहणारे सर्पमित्र अप्पा दुगड यांनी पकडलेल्या घोणस या विषारी जातीच्या सापाने एका रात्रीत तब्ब्ल ६५ पिल्लांना जन्म दिला आहे. या सापाच्या पिलांना पाहण्यासाठी सध्या मोठ्याप्रमाणात नागरिकांनी दुगड यांच्या घरी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील धायरी परिसरात काल दुपारी एका शेतामध्ये साप असल्याची माहिती सर्प मित्र अप्पा दुगड यांना नागरिकांनी दिली. त्यांनतर त्यांनी धायरी येथील शेतामध्ये जाऊन सापाचा शोध घेतला. तो घोणस या जातीतील साप असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी या सापाला पकडून त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांनी या सापाला फिशटॅंक सारख्या काचेच्या भांड्यात ठेवले. त्याच दरम्यान त्यांना या घोणसच्या पोटात पिल्लं असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे विशेष लक्ष देण्यात आले. या घोणसने रविवारी रात्री एक नव्हे दोन नव्हे तर तब्ब्ल ६५ पिल्लांना जन्म दिल्याची घटना घडली. यामुळे त्यांच्या घरातील सर्व आश्चर्य चकित झाले. या पिल्लांना पाहण्यासाठी या परिसरातील एकच गर्दी झाली होती. या घटनेनंतर अप्पा दुगड यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पानशेत येथील जंगलात घोणस आणि ६५ पिलांना सोडून दिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghonas birth 65 snakelets in pune ghonas birth 65 snakelets in pune
First published on: 26-06-2017 at 22:10 IST