Girls Fighting On Road Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम राहीला नाही. रस्त्यावर घडणारी घटना कुणीतरी लपून छपून कॅमेरात कैद करतो आणि इंटरनेटवर व्हायरल करतो. असं असतानाही काही जणांना आपण भर रस्त्यात कसे वागतोय, याचंही भान राहिलेलं नसतं. असाच धक्कादायक प्रकार उत्तराखंडच्या रुडकी येथे उघडकीस आला आहे. कही कारणांमुळे तीन-चार तरुणींमध्ये बाचाबाची झाली अन् त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. रुडकीच्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास या तुरणींच्या ग्रुपमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणींनी झिंज्या उपटत लाठ्याकाठ्यांनी केली मारहाण

उत्तराखंडच्या रुडकी येथील रस्त्यावर तरुणींच्या एका ग्रुपमध्ये हाणामारी झाल्याची घटना व्हिडीओच्या माध्यमातून इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. तीन-चार तरुणी एकमेकींच्या झिंज्या उपटत स्टिक्सने मारहाण करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ही घटान कधी घडली आहे, याबाबती कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीय. तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं आजूबाजूच्या लोकांना कळतं. त्यानंतर ते तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणींमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तरुणींमध्ये हाय-वोल्टेज ड्रामा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नक्की वाचा – नडला त्याला वाघाने फाडला! आख्ख्या गावासमोर वाघाने शेतकऱ्यावर मारला पंजा, थरारक Video कॅमेरात झाला कैद

इथे पाहा व्हिडीओ

तरुणींमध्ये झालेल्या हाणामारीची कोणतीही तक्रार करण्यात आली नाहीय, अशी माहिती सिव्हिल लाईनचे कोटवाली येथील प्रभारी देवेंद्र चौहान यांनी दिल्याचं समजते. कोणाकडूनही या प्रकाराबाबत तक्रार दाखल झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, तरुण मुलांमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून हाणामारी होत असल्याच्या घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत असातात. उत्तराखंडच्या या घटनेनंही अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भर रस्त्यात तरुणींनी धिंगाणा घालून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तरुणांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसी खाक्या दाखवण्याची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls fight on uttarakhand roorkee road girls beat each other by hitting sticks and punches twitter video goes viral nss
First published on: 26-12-2022 at 10:34 IST