‘गुगल’चं महत्त्व आपल्यासाठी किती मोठं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. छोट्या मोठ्या गोष्टींबदद्ल माहिती, कोणतीही मदत एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध होते. अगदी गल्लीबोळात आपण हरवलो तर पत्तासुद्धा शोधायला गुगल मदत करतं. अशा या सर्च इंजिनचा आज १९ वा वाढदिवस. यासाठी गुगलनं डुडल तयार केलं आहे. १९ व्या वाढदिवसानिमित्तानं खास १९ सरप्राईज गुगलनं युजर्ससाठी आणली आहेत. तेव्हा गुगलच्या होम पेजवर तुम्ही क्लीक केल्यास गुगलकडून एक नाही तर तब्बल १९ आश्चर्याचे सुखद धक्के तुम्हाला मिळणार आहेत.

वाचा : तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलंय, हे कसं ओळखाल?

desi jugaad boy started crying when traffic police caught his scooty funny video goes viral on social media
“काकी प्लीज मला सोडा, पप्पा…” ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलाचा अनोखा जुगाड; मजेशीर VIDEO व्हायरल
Pomfret Che Sukka Recipe In Marathi Pomfret Recipe malavani style recipe
चमचमीत आणि चविष्ठ पापलेट सुक्का; अस्सल मालवणी बेत नक्की ट्राय करा
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Make Tasty Crispy Leftover Roti Chivda Not The Recipe And Try This Ones At Your Home
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा झटपट अन् कुरकुरीत ‘पोळीचा चिवडा’ ; नोट करा सोपी रेसिपी

गुगलने आपल्या प्रत्येक वाढदिवसाला डुडलद्वारे नेहमीच काहीतरी हटके तयार केलं आहे. फक्त आपला वाढदिवसच नाही, तर अनेक महत्त्वाच्या घटना, महान व्यक्तींची पुण्यतिथी, जयंती या दिवशी गुगलने डुडलद्वारे त्या व्यक्तीनां मानवंदना दिली. आदरांजली वाहिली. या १९ वर्षांत गुगलचे असेच लोकप्रिय ठरलेले काही डुडल्स ‘१९ सरप्राईज’मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यासाठी होमपेजवर दिसणाऱ्या चक्रावर क्लिक केल्यास तुम्हाला एक एक करुन नवनव्या डुडल्सचा उलगडा होत जाईल. त्यामुळे गुगल सुरू केल्यानंतर या १९ सरप्राईजमुळे तुमच्या दिवसाची सुरूवात एकदम छान जाईल हे नक्की!

आज गुगलचा १९ वा वाढदिवस असला तरी वाढदिवसाच्या तारखेबद्दल संभ्रम काही मिटला नाही. आश्चर्याची गोष्ट अशी की गुगलने आतापर्यंत वेगवेगळ्या तारखांना आपला जन्मदिवस साजरा केला आहे. गुगलने ७, ८, २६ आणि २७ सप्टेंबर अशा वेगवेगळ्या तारखांना आपला वाढदिवस साजरा केला आहे.

वाचा : व्वा! शेफला सुट्टी देण्यासाठी मालकाने आठवडाभरासाठी हॉटेलच ठेवलं बंद