बापरे… ‘तो’ आरोप सिद्ध झाल्यास गुगलला द्यावी लागणार ३७ हजार ७०० कोटींची भरपाई

इनकॉग्नीटो मोडसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल

प्रातिनिधिक फोटो

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलविरोधात कॅलिफोर्नियामधील न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. गुगलची सेवा वापरताना लाखो युझर्स हे गुगलचा क्रोम हा ब्राउझर ‘प्रायव्हेट मोड’ म्हणजेच ‘इनकॉग्नीटो मोड’मध्ये वापरत असतानाही गुगलने युझर्सच्या गोपनीयतेचा भंग करत माहिती मिळवल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. मंगळवारी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे. या याचिकेमध्ये नुससान भरपाई म्हणून गुगलने ५ बिलीयन अमेरिकन डॉलर (भारतीय चलनामध्ये अंदाजे ३७ हजार ७०० कोटी रुपये) देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुगलचे मुख्यालय असणाऱ्या कॅलिफोर्नियामधील जिल्हा न्यायलयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. गुगल क्रोम वापरणारे युझर्सच काही खासगी माहिती सर्च करताना इनकॉग्नीटो मोडमध्ये सर्च करत असले तरी गुगल युझर्सच्या इंटरनेटवरील हलचालींवर लक्ष ठेवून असल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. मुळात इनकॉग्नीटो मोडच्या माध्यमातून इंटरनेटवर ब्राउज करताना होणाऱ्या सर्च आणि माहितीच्या शोधासंदर्भातील रेकॉर्ड ठेऊ नये असं अपेक्षित असतं. ब्राऊजिंगचे माध्यम ठरणाऱ्या ब्राऊजरने इनकाग्नीटो मोडवर युझर्सच्या प्रयव्हसीसंदर्भात अधिक दक्ष राहत तो काय सर्च करत आहे, कोणती माहिती शोधत आहे यासंदर्भातील रेकॉर्ड ठेवणे अपेक्षित नसतं. याच नियमांचे गुगलने उल्लंघन केल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये गुगल दोषी अढळल्यास त्यांनी त्यांच्या युझर्सच्या संमतीशिवाय त्यांची माहिती गोळा केल्याचे सिद्ध होईल. त्याचबरोबर गुगलला ३७ हजार ७०० कोटींची भरपाईही द्यावी लागेल.

गुगलने प्रायव्हसीसंदर्भात आणखीन एक महत्वाच्या नियमाचे उल्लघन केलं असल्याचं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार एखाद्या शाजगी संवादासंदर्भातील माहिती वाचणे किंवा जाणून घेण्यापूर्वी यासंदर्भात सहभागी असणाऱ्या सर्व पक्षांची संमती घेणं बंधनकारक असतं. अमेरिकेमधील फेड्रल वायरटॅप कायदाही खासगी माध्यमातून झालेल्या संवादाची माहिती घेण्यावर निर्बंध घालतो. कायद्याचे उल्लंघन करुन जर सेवा पुरवणाऱ्या कंपनीने माहिती गोळा केली असेल तर त्यासंदर्भात दाद मागण्याचा अधिकार वापरकर्त्यांना आहे.

“गुगल युझर्सच्या ब्राउझिंग इतिहास म्हणजेच ब्राउझिंग हिस्ट्री आणि इतर वेब अ‍ॅक्टिव्हिटी डेटाची माहिती जमवतो आणि ती साठवून ठेवतो. युझर्सने आपली खासगी माहिती उघड होऊ नये म्हणून गोपनीयतेसंदर्भात कोणत्याही उपाययोजना केल्या असतील तरी त्याची पर्वा कंपनी करत नाही,” असा आरोप तक्रारदाराने केला आहे. कंपनीने गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल नुकसान भरपाई देण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

गुगलचे म्हणणे काय?

गुगलच्या प्रवक्त्यांनी याचिकाकर्त्याने केलेले दावे चुकीचे असल्याचे सांगत त्याचा विरोध केला आहे. “आम्ही या दाव्यांचा विरोध करत आहोत. आम्ही त्यांच्याविरूद्ध आक्रामकपणे आपली बाजू मांडून न्यायलयामध्ये स्वत:चा बचाव करणार आहोत,” असे गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

“क्रोममधील इनकॉग्नीटो मोडचा वापर केल्यास तुम्ही इंटरनेटवर काय माहिती सर्च करत आहात यासंदर्भातील रेकॉर्ड तुमच्या ब्राउझर किंवा डिव्हाइसवर दिसणार नाही यासंदर्भातील सुविधा उपलब्ध करुन देते. प्रत्येक वेळी युझर्सने नवीन इनकॉग्नीटो टॅब उघडल्यास त्या सेशनमधील ब्राउझिंग संदर्भातील माहिती वेबसाइटकडून गोळा केली जाऊ शकते,” असं प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

इनकॉग्नीटो मोडमध्ये युझर्सचा कोणताही ब्राउझिंग डेटा गोळा केला जात नाही हा गैरसमज असल्याचेही प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. इनकॉग्नीटो मोडमध्ये क्रोम ब्राउझर स्वत: कोणतीही माहिती साठवून ठेवत नाही. मात्र ज्या वेबसाईटला युझर्स या मोडमधून भेट देतात किंवा इंटरनेट सेवा पुरवतात त्या कंपन्या ही माहिती साठवतात असंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. इनकॉग्नीटो मोडमध्ये गुगल क्रोम युझर्सने भेट दिलेल्या वेबसाईट युझर्सच्या इंटरनेट ब्राउसिंगबद्दल गुगल अ‍ॅनालिटिक्स सारख्या साधनांद्वारे माहिती काढू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Google chrome faces rs 37700 crore lawsuit for tracking users in incognito mode scsg

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या