हसऱ्या चेहऱ्यामागे काय दु:ख दडलंय, हे सांगणं अवघडच. शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे, ही गोष्ट अधोरेखित करत गेल्या काही वर्षांपासून देशात मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीला सुरुवात झाली. मात्र अजूनही नैराश्य ही संकल्पना अनेकांना माहीतच नाही. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेनंतर पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची जोरदार चर्चा होऊ लागली. सुशांतने रविवारी (१४ जून) त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर गुगलवर नैराश्य Depression म्हणजे काय हे अधिकाधिक सर्च केलं जाऊ लागलं. गेल्या २४ तासांत नेटकऱ्यांनी ‘डिप्रेशन’ हा शब्द करोना व्हायरसपेक्षाही जास्त सर्च केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळ, नागालँड, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात या देशांमध्ये हा सर्च जास्त केला गेला. सुशांतच्या डिप्रेशनमागचं कारण, डिप्रेशनचा अर्थ काय याबाबत नेटकऱ्यांनी सर्च केलं.

आणखी वाचा : ‘त्या लोकांच्या कर्मामुळे तुझा जीव गेला’; सुशांतसाठी दिग्दर्शकाचं भावनिक ट्विट 

अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतला. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘किस देश मै है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने करिअरची सुरुवात केली. मात्र ‘पवित्र रिश्ता’मुळे तो घराघरांत पोहोचला होता. २०१३ मध्ये सुशांतने ‘काई पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘पीके’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्राइव्ह’ या चित्रपटात तो शेवटचा झळकला होता.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google search of depression increased more than corona virus after sushant singh rajput suicide ssv
First published on: 15-06-2020 at 17:35 IST