Viral Video: नवरदेव नकळत उचलत होता लग्नाच्या स्टेजवर पडलेली दोन हजारांची नोट, त्यानंतर वधूने केलं असं काही की…

स्टेजवर उभ्या असलेल्या नवरदेवाचे कृत्य पाहून सगळे हैराण झाले.

आजकाल सोशल मीडियावर तुम्ही वधू-वरांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. यात काही मजेशीर व्हिडीओ देखील पाहिले असतील. असाच एक मजेशील व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा व्हिडीओ एका लग्नाचा आहे, ज्यामध्ये वधू-वर स्टेजवर उभे आहेत आणि त्यांचे नातेवाईकही त्यांच्यासोबत उभे राहून नाचत आहेत. यादरम्यान स्टेजवर उभ्या असलेल्या नवरदेवाचे कृत्य पाहून सगळे हैराण झाले. या वराने लग्नात जे केले ते क्वचितच कोणत्या वराने केले असेल. वराच्या कृत्यानंतर वधूने जे केलं ते तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळेल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वरमाळा घालल्यानंतर वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत आणि खूप आनंदी दिसत आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक देखील त्यांच्याभोवती उभे आहेत आणि आनंदाने नाचत आहेत. तेवढ्यात दोन हजाराची नोट देखील स्टेजवर पडली आहे आणि वर तिथे बसून स्टेजवर पडलेली नोट उचलून चुपचाप खिशात ठेवतोय. त्यानंतर वराला चूप ठेवण्यासाठी वधू त्याच्या हातात एक नोट देते आणि हसायला लागते.

तुम्ही देखील कोणत्याही नवरदेवाला स्वतःच्याच लग्नात अशा प्रकारे पैसे उचलताना कधीच नसेल पाहिलं, हे मात्र नक्की. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom picked up 2 thousands note on wedding see what bride does after that viral video hrc

Next Story
VIRAL VIDEO : ऐन हिमवर्षावात रेस्तरॉंमध्ये जाऊन खाण्याची इच्छा झाली… पण टाळे पाहून त्याने गुडघे टेकले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी