मंगळावरील भूस्खलनाचा फोटो पाहिलात का?;ESA ने शेअर केलेला फोटो व्हायरल

सुमारे दोन दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्ट केल्यापासून, फोटोला २२,००० पेक्षा जास्त लाइक्स आहेत.

landslide on Mars
मंगळावर भूस्खलन (फोटो:Instagram/@europeanspaceagency)

मंगळ, सूर्यापासून चौथा स्थानी असलेला ग्रह लोकांमध्ये नेहमीच कुतूहल निर्माण करतो. वेगवेगळ्या देशांनी केलेल्या वैज्ञानिक शोधांमुळे लोकांना या शेजारच्या ग्रहाबद्दल थोडे अधिक जाणून घेण्यास मदत झाली आहे. तसेच, जगभरातील अंतराळ संस्थांद्वारे विविध सोशल मीडियाद्वारे प्रत्येक वेळी लोकांना मंगळाची मंत्रमुग्ध फोटो पाहण्याची संधी मिळते. युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) द्वारे सामायिक केलेल्या या पोस्टमध्ये ‘मार्टियन लँडस्लाइड’ ची अविश्वसनीय फोटो आहे.

काय आहे नक्की फोटोमध्ये?

“१३ एप्रिल २०२१ रोजी एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरने हा फोटो काढलेला. मंगळाच्या एओलिस प्रदेशात (151.88 ° E/27.38 ° S) ३५ किमी रुंद खड्ड्याच्या काठावर ५ किमी लांबीचा भूस्खलन त्या फोटोमध्ये दिसू शकतो.” असं एजन्सीने लिहिले. पुढील काही ओळींमध्ये त्यांनी भूस्खलनाबद्दल अधिक स्पष्ट केले.
“भूस्खलन ही विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितींमध्ये घडणारी भौगोलिक प्रक्रिया आहेत. पृथ्वीप्रमाणे मंगळावर, ते विविध साईज आणि आकारात येतात आणि पृथ्वीवरील अॅनालॉग्सचा वापर ग्रहांच्या शरीरावर दिसणाऱ्या समान प्रक्रिया समजण्यासाठी केला जातो. ”त्यांनी पोस्टच्या खाली पुढे लिहले आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

सुमारे दोन दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्ट केल्यापासून, फोटोला २२,००० पेक्षा जास्त लाइक्स आहेत आणि ही संख्या वाढतच आहे. या फोटोवर काही लोकांनी आवर्जून कमेंट्सही केल्या आहेत. “सुंदर” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “विलक्षण” अजून एका वापरकर्त्याने कमेंट केली.

पोस्टबद्दल तुमचे काय मत आहे?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Have you seen the photo of the landslide on mars the photo shared by esa is viral ttg

ताज्या बातम्या