एक पर्यटक आणि सिंह यांचा एक एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मासाई दर्शने या युट्युब चॅनेलने शेअर केलेला हा व्हिडीओ आफ्रिकेतील सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये शूट करण्यात आला आहे. सफारी वाहनाच्या खिडकीबाहेर हात काढून एक पर्यटक सिंहाला हात लावायचा आणि त्याच्यासोबत फोटो काढ्याचा प्रयत्न करताना दिसतो.

नक्की काय झालं?

व्हिडीओची सुरुवात एका पर्यटक सिंहाला गाडीच्या खिडकीजवळ बसलेला आहे हे दाखवतो. त्यानंतर तो खिडकी उघडून सिंहाला हात लावण्यासाठी पुढे जातो. काही सेकंदात, सिंह चिडतो आणि माणसावर रागाने ओरडू लागतो. यामुळे सहाजिकच माणूस घाबरतो आणि पटकन खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करतो. चित्रीकरण करणारी व्यक्ती खिडकीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असताना व्हिडीओ अंधुक फ्रेममध्ये संपतो.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

“सेरेनगेटीमधील एका पर्यटकाने नर सिंहाला स्पर्श करण्याचा निर्णय घेतला. हे करणे खूप मूर्खपणाचे आहे आणि असे केल्याने तुम्ही सहजपणे स्वत: लाच इजा करून घेऊ शकता किंवा तुमच्यावर राष्ट्रीय उद्यानात बंदीही घातली जाऊ शकते” असं कॅप्शन लिहलेलं आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या घाबरवून सोडणाऱ्या व्हिडीओला आत्तापर्यंत ४.२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. पर्यटकांच्या मूर्खपणामुळे लोक संतप्त झाले आणि अशाच प्रकारच्या कमेंट्सही नेटीझन्सने केल्या आहेत. या व्हिडीबद्दल तुमचे काय मत आहे?