Viral video: नुकतीच देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारतात लोकांना चांगलीच होळीची झिंग चढली होती. होळी म्हंटलं की मद्यपींसाठी पर्वणीच असते. दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. इथपर्यंत सगळं ठिक आहे. पण एका व्यक्तीनं असा प्रकार केला, ज्यामुळे आपला जीव देखील त्याने धोक्यात टाकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तुम्हीही पाहून लोटपोट व्हाल…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दारू पिल्यानंतर एक व्यक्तीचा कसा तोल जातो आणि तो नाल्यात पडतो. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेला दुसरा व्यक्ती रस्त्याच्या मधोमध जाऊन दुचाकीस्वाराला धडकतो आणि त्याच्यासह दुचाकीस्वाराला खाली पाडतो. व्हिडिओमध्ये पुढे दिसून येते की दारूच्या नशेत एक माणूस मोटरसायकल सुरू करतो आणि समोरच्या घराच्या दरवाजावर धडकतो. दारूच्या नशेत नाचताना दुसरी व्यक्ती खाली पडते.

gold and silver Pani Puri
सोने-चांदीची पाणी पुरी! मोदींच्या गुजरातमधील या पाणी पुरीची एकच चर्चा; व्हायरल VIDEO एकदा पाहाच
Video: 5 Including 4 Family Members Killed In Road Accident
दुचाकीला धडक देऊन कार हवेत उडाली अन् ३ वेळा पलटली; १० सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO व्हायरल
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Tiger Save His Life From Crocodile By Using His Brain
VIDEO: वाघाने दाखवलं मगरीला अस्मान! तावडीतून असा सुटला की, मगरच तोंडावर आपटली! वाघाचा जबरदस्त कमबॅक एकदा बघाच

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यू जवळ आला पण चमत्कार झाला; दैव बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला, पाहा थरारक VIDEO

@sanjayjourno नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ६० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ फारच मजेदार आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. यावर अनेकजण मजेशीर कमेंटही करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले… वाईट वाटू नका, ही होळी आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले… मित्रांनो होळीपूर्वी ट्रेलर पहा. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… त्यांना हे सर्व करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.