जवळजवळ दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नंबर एकवर आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. चैतन्य साक्षीबरोबर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतो आणि सुभेदार कुटुंबाला ही बातमी देतो. याचा सीक्वेन्स सध्या या मालिकेत सुरू आहे.

एका बाजूला या बातमीने सुभेदार कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे; तर दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायलीचं सत्य चैतन्य साक्षीला सांगण्याच्या तयारीत आहे. नवीन आलेल्या प्रोमोमध्ये सोमवारच्या (२९ मार्च) भागात साखरपुड्याची बातमी दिल्यानंतर चैतन्य घरी परततो. घरी आल्यानंतर साक्षी आणि चैतन्यचा संवाद सुरू असतो. तेव्हा साक्षी चैतन्यला म्हणते, “अर्जुन आणि सायली आदर्श कपल आहे.” त्यावर चैतन्य साक्षीला सांगतो, “आदर्श कपल? अर्जुन आणि सायली तर खरे कपलसुद्धा नाही आहेत. हे त्यांनी एकमेकांच्या सोईसाठी केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे”, हे ऐकून साक्षीला चांगलाच धक्का बसतो.

हेही वाचा…“संकर्षण कऱ्हाडे भित्रा ससा होता”, अभिजीत खांडकेकरने सांगितला मित्राबद्दल ‘तो’ किस्सा, म्हणाला…

एकीकडे अर्जुन व सायलीच्या लग्नाचं सत्य चैतन्य साक्षीला सांगतो. तर, दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे साक्षीचं सत्य चैतन्यसमोर कसं येईल याचा विचार करत असतात. त्यावर बोलताना अर्जुन सायलीला म्हणतो, “मी असे काही गुन्हेगार पाहिले आहेत; जे त्यांच्या गुन्ह्याचे पुरावे कधीच नष्ट करीत नाहीत. कारण- त्या गुन्ह्यांच्या आठवणींनी त्यांच्या अहंकारी स्वभावाला चालना मिळते.” त्यावर सायली म्हणते, “हे साक्षीच्या बाबतीतही खरं असेल तर?”

हेही वाचा… “मला परभणीची भाकर म्हणून चिडवायचे”, अभिजीत खांडकेकरला बालपणी होता भयंकर न्यूनगंड, आठवण सांगत म्हणाला…

“पण आता प्रश्न हा आहे की, ते पुरावे शोधायचे कुठे?”, असं अर्जुन म्हणतो. त्यावर सायली म्हणते, “आपल्याला तिच्या घरीच जावं लागेल.”

हेही वाचा… “मी गणपतीची भक्त आहे”, विद्या बालनचं वक्तव्य; म्हणाली, “मी धार्मिक कामासाठी देणगी….”

आता साक्षीसमोर अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे सत्य समोर आले आहे. तर, याचा गैरफायदा घेत, हे सत्य ती प्रिया आणि सुभेदार कुटुंबाला सांगणार का? त्यानंतर सुभेदार कुटुंब काय पाऊल उचलेल? अर्जुन आणि सायलीमधलं नात कायमचं संपेल आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होईल का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील भागांमध्ये करण्यात येईल.