Viral Video: केस लांबसडक असो वा बारीक, राठ असो किंवा अगदीच मुलायम; केसांची सुंदरता वाढविण्यासाठी कामी येतो तो कंगवाच.महिलांना केसांच्या विविध हेअरस्टाईल करण्यासाठी आणि पुरुषांनासाठी हा कंगवा उपयोगी पडतो. पुरुषांच्या खिसा किंवा पाकिटात तो विसावलेला असतो. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती मृत प्राण्यांच्या शिंगापासून कंगवा बनवते आहे.

व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती शिंगापासून कंगवा बनविण्याची पूर्ण प्रक्रिया दाखवते आहे . सगळ्यात पहिल्यांदा एक कामगार एका गोणीतून मृत प्राण्यांची अनेक शिंगे काढतो. नंतर गुणवत्ता आणि आकारानुसार ती वेगवेगळी करू लागतो. कारागीर यंत्राच्या साह्याने शिंगे कापून, त्यांना कंगव्यांचे आकार देण्यासाठी ती शिंगे घासून घेताना दिसतो. एकदा तुम्हीसुद्धा बघा कशा प्रकारे बनवला जातोय कंगवा.

हेही वाचा…‘शृंगार करून नटलेली मराठी भाषा…’ मुंबई पोलिसांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या दिल्या अनोख्या शुभेच्छा; पाहा पोस्ट

पोस्ट नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, यामध्ये कंगवा बनविण्याची प्रत्येक पायरी दाखवण्यात आली आहे. प्राण्यांच्या शिंगांना आगीत गरम करून मऊ केले जाते आहे. नंतर त्या गरम करून घेतलेल्या शिंगांवर मशीनच्या साह्याने भार दिला जात आहे; जेणेकरून ती शिंगे सपाट होऊन जातील. त्यानंतर पट्टीच्या साह्याने सपाट करून घेतलेल्या शिंगांना कंगव्याचा आकार दिला जातो आहे. त्यानंतर मशीनच्या साह्याने कंगव्याचे दात तयार केले जात आहेत.

अशा प्रकारे या छोट्या कारखान्यात हा कंगवा तयार करण्यात आला आहे. बाजारात सहज उपलब्ध होणारा हा कंगवा कामगारांच्या मदतीने, इतक्या मेहनतीने बनविला जातो. हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Rainmaker1973 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया, तर काही युजर्स आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तर या कमेंट्स बघता, एका युजरने कमेंट केली आहे की, शिंगाचा वापर अनेक शतकांपासून कंगवा, विविध भांडी आणि सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी केला जात आहे.