मेरी कोवेल या अमेरिकन लेखिकेने केलेले काही ट्विट सोशल नेटवर्किंगवर चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे. ‘अंतराळामध्ये अंतराळवीर लघुशंका कशी करतात’ यासंदर्भातील एक दोन नाही तब्बल २७ ट्विटस मेरीने केले आहेत. या ट्विटसमध्ये अंतराळामध्ये लघुशंका करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशी मात मिळवली जाते याबद्दलचे मजेदार किस्से आणि माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर मेरीने ‘द न्यू यॉर्क टॉइम्स’साठी एक निबंध लिहिला होता तिथूनच तिला हे ट्विट करण्याची कल्पना सुचली. नासाच्या अवकाश संशोधन कार्यक्रमामध्ये कशाप्रकारे स्त्री-पुरुष भेदभाव केला जातो यासंदर्भात मेरीने ‘टू मेक इट टू द मून वुमन हॅव टू एस्केप अर्थस जेंडर बायस’ या मथळ्याखाली निबंध लिहिला होता. यामध्ये मेरीने १९६९ साली आखण्यात आलेली चंद्र मोहिम ही ‘पुरुषांनी पुरुषांसाठी आखलेली मोहीम’ होती असा आरोप केला आहे. या निबंधावरुन अनेकांनी मेरीवर टिका केली आहे. शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये महिलांनी लघुशंका कशापद्धतीने करावी यासाठीचे तंत्रज्ञान १९६९ मध्ये विकसित झाले नव्हते म्हणून महिला अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात आले नव्हते असे टिकाकारांनी म्हटले आहे. याच टिकेनंतर मेरीने आपला मुद्दा मांडण्यासाठी २७ ट्विटस केले आहेत. पाहुयात काय म्हणतेय ती या ट्विटसमध्ये…

निबंधाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल ती पहिल्या ट्विटमध्ये म्हणते…

आता विरोधाभास पाहा…

अंतराळात गेलेला पहिला अमेरिकन, १५ मिनिटांची मोहिम आणि लघुशंकेची सोयच नाही

…पण त्यांना स्पेससूटमध्ये लघुशंका करावी लागली

उपाय शोधला पण…

अंतराळवीरांची मागणी

मुख्य अडचणीवर उपाय मिळाला पण लघुशंकेच काय

योग्य पद्धतीने केल्यास अशाप्रकारे अंतराळवीरांना करावी लागते लघुशंका…

एवढा त्रास सहन करावा लागतो

स्पेसवॉकच्या वेळेस काय करतात

लघवी गोठू नये म्हणून…

यानात उडत असतात लघवीचे अंश

मूत्रपिंडाला संसर्ग झाला…

अखेर महिलांना अंतराळात पाठवले तेव्हा हा उपाय शोधला…

पुरुषांनीच महिलांसाठी शोधलेला पर्याय वापरायला सुरुवात केली कारण…

अंतराळात शौचाला जाणे आणि लघुशंकेला जाणे अवघड

रिलिफ बॅग्स वापरल्या जातात त्या अशा

जांभळ्या रंगाची लघवी

मुद्दा असा की तंत्रज्ञान ही अडचण नव्हतीच महिलांना अंतराळात पाठवण्यासाठी

इतर शंकांची उत्तरेही जाणून घ्या…

मासिक पाळीचे काय…

१०० पुरेसे झाले का?

…म्हणून लघुशंका करण्याचेही वेळापत्रक

प्रक्षेपणाला उशीर झाला तेव्हा युरी गागरीनने काय केलं होतं

मेरीच्या या ट्विटसला हजारोंच्या संख्येने ट्विटस आणि लाईक्स मिळाले असून ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मेरी या अमेरिकेतील लोकप्रिय लेखिका असून त्यांनी ‘शेड्स ऑफ मिल्क अॅण्ड हनी’ तसेच ‘गॅमरस इन ग्लास’ ही पुस्तके लिहिली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How do astronauts pee in space sci fi author says it all in crazy viral thread scsg
First published on: 23-07-2019 at 15:56 IST