काळानुसार माणसांमध्ये तर अनेक वस्तूंमध्येदेखील बदल झालेले आपण पाहिले आहेत. सुरुवातीच्या काळात नदी, कूपनलिका यांचा उपयोग पाणी भरण्यासाठी करण्यात यायचा, तर आता घरांमध्ये टाक्या बसवून घेण्यात येतात किंवा टेरेसवर प्लास्टिकच्या मोठ्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवण्यात येते. अनेकदा आपण या पाण्याच्या टाक्या बघून विचार करत असतो की, या टाक्या कशा बनवल्या जात असतील. तर आज व्हायरल व्हिडीओत पाणी भरून ठेवण्यात येणाऱ्या या प्लास्टिकच्या टाक्या कश्या तयार केल्या जातात याची एक झलक दाखवण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओ एका कारखान्याचा आहे. कामगार एका वर्तुळाकार साच्यात एक लोखंडी साधन ठेवून त्यात निळ्या रंगाचे प्लास्टिक टाकतो आहे. यानंतर या साधनाला नट-बोल्टच्या सहाय्याने बंद करून आगीवर भाजण्यासाठी ठेवून दिले आहे आणि गोल-गोल फिरवण्यात येत आहे. जेणेकरून आतमध्ये टाकलेले प्लास्टिक सर्वत्र पसरले जाईल. त्यानंतर लोखंडी साधनाला बाजूला घेऊन जाऊन त्यावर पाणी शिंपडण्यात आले. कशाप्रकारे पाण्याची निळ्या रंगाची टाकी बनवण्यात येते आहे, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

हेही वाचा… केळीचे वेफर्स खायला आवडतात का? जाणून घ्या कसे तयार करतात? पाहा व्हायरल व्हिडिओ

व्हिडीओ नक्की बघा :

अशी तयार केली पाण्याची टाकी :

लोखंडी साधनाला बाजूला नेऊन त्यावर पाणी शिंपडले, जेणे करून आतमध्ये असलेले प्लास्टिक व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर लोखंडी साधनाला खोलण्यात आले आणि आतमध्ये तयार झालेल्या प्लास्टिकच्या टाकीला बाहेर काढण्यात आले. अशा खास पद्धतीत निळ्या रंगाची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. ही तयार झालेली पाण्याची टाकी उचलून बाहेर नेण्यात आली आहे आणि त्याला ड्रील मशीनच्या सहाय्याने खड्डा पाडला आहे. तसेच टाकीचा वरचा भाग कापून घेऊन पाणी काढण्यासाठी जागा करण्यात आली आहे. त्यानंतर त्यावर कंपनीचे लेबल लावून निळ्या रंगाची पाण्याची टाकी विक्रीसाठी तयार करून ठेवली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @aapnasutechnology या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच अनेकांना पाण्याची टाकी बनवण्याची प्रक्रिया खूप अनोखी वाटली आहे. तसेच काही जण व्हिडीओ बघून विविध प्रश्न विचारताना कमेंटमध्ये दिसत आहेत आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे.