तुम्हाला अनेकदा पार्टी किंवा फंक्शन्समध्ये दम आलू पाहायला मिळतो. त्याच्या अप्रतिम चवीमुळे या रेसिपीला खूप मागणी आहे. जर घरात काही पाहुणे आले असतील आणि तुम्हाला त्यांच्यासाठी काही खास रेसिपी करायची असेल तर पंजाबी दम आलू हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही याला रोटी किंवा भात दोन्हीसोबत सर्व्ह करू शकता. दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, दम आलू जेवणांची चव आणखी वाढवते. सर्व वयोगटातील लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. ही रेसिपी तयार करणे फार अवघड नाही. जर तुम्ही आत्तापर्यंत ही रेसिपी घरी करून पाहिली नसेल, तर एकदा तयार करुन पाहा.

चला तर मग दम आलू कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

हेही वाचा : Cold Soup Recipe: उन्हाळ्यात प्या थंडगार काकडी सूप; दिवसभर राहा हायड्रेट

दम आलू कसा तयार करावा?

साहित्य : अर्धा किलो बटाटे( गोल व एकसारख्याच आकाराचे ) अर्धाकप दही, तिखट १ चमचा, धणेपूड २ चमचे, सुंठपूड १ चमचा, बडीशेप पूड, २ चमचे, २ तमालपत्र, १ चमचा गरम मसाला, चवीला मीठ, २ मोठे चमचे खवा, अर्धी वाटी तूप व तेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती : बटाटे अर्धवट उकडा, फार मऊ करु नका. उकडताना पाण्यात मीठ घाला म्हणजे बटाटे फुटणार नाहीत. बटाटे सोलून टुथपिकने टोचून घ्या व तेलात गुलाबी रंगावर तळून घ्या. दुसरीकडे तूप गरम करुन हिंगाचे पाणी घातलेले दही घाला. त्यात तमालपत्र व इतर मसाला व खवा घाला व परता. मग बटाटे, मीठ टाका व पाणी आटवा. पुन्हा पाणी सुकवा. शेवटी २ लहान वेलदोड्याची पूड पेरा.