Tulsi Plant: हिंदू घरांमध्ये तुळशीच्या रोपाला रोज सकाळी पाणी घालण्याची प्रथा आहे. आयुर्वेदातही तुळशीच्या रोपाचे महत्त्व सांगितले आहे. घरामध्ये तुळशीची रोप असेल तर त्यांची पाने सर्दी-खोकला दूर ठेवण्यासाठी वापरतात. अशाप्रकारे, हे अनेक प्रकारचे संक्रमण दूर ठेवण्यास देखील मदत करू शकते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती मानली जाते. जिथे सनातन धर्मात तिला देवीची उपाधी मिळाली आहे तिथे तिला आयुर्वेदात ‘औषधींची राणी’ असेही म्हणतात. परंतु, हिवाळ्याच्या काळात या वनस्पतीचे जतन करणे कठीण काम आहे. थंडी वाढली की घरात किंवा बाल्कनीत ठेवलेली तुळशीची रोपे सुकायला लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हिरवेगार ठेवू शकता.
हिवाळ्यात तुळशीची अशी काळजी घ्या
उन्हात ठेवा
तुळशीचे रोप निरोगी ठेवण्यासाठी ते सूर्यप्रकाशात ठेवणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही तुळस उन्हात ठेवली तर ती नेहमी हिरवीगार राहते. तुळस किमान ६ ते ७ तास सूर्यप्रकाशात ठेवणे आवश्यक आहे.
पाणी कमी द्यावे
हिवाळ्याच्या काळात तुळशीच्या रोपांना शक्य तितके कमी पाणी द्यावे. जर तुम्ही हिवाळ्यात जास्त पाणी देत असाल तर तुळशीचे रोप सुकायला लागते.
हेही वाचा – कांद्यामध्ये ‘हे’ तेल टाकून पेटवा वात? भन्नाट ट्रिक वापरून पाहा, मच्छर, पाल आणि उंदरांपासून मिळू शकते सुटका
कडुलिंबाची पाने
या ऋतूत कडुलिंबाची कोरडी पानं आणावीत आणि ती उकळून थंड करावीत. आता हे पाणी तुळशीच्या झाडात टाका. झाडे हिरवी राहतील.
झाकून ठेवा
या ऋतूमध्ये तुळशीची पाने सुती कपड्याने झाकून ठेवावीत. तुम्ही ते लाल कापडाने झाकून ठेवू शकता. यामुळे ते थंड वाऱ्यापासून सुरक्षित राहतात.
हेही वाचा – रोज जेवल्यानंतर गोड पदार्थ खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?
रोप घरात ठेवा
जर खूप थंड असेल तर हे रोप घरामध्ये किंवा जास्त थंड नसलेल्या ठिकाणी ठेवणे चांगले. असे केल्याने ते कोरडे होण्यापासून संरक्षित केले जातील.
या गोष्टी लक्षात ठेवा
- आठवड्यातून एकदा तुळशीच्या रोपाची छाटणी करा
- कुंडी बदलताना ज्याच्या मुळांना सावधगिरीने काढा
- पानांना छिद्र असेल तर पाणी आणि एक चमचा डिश डिक्विड टाकून पेस्ट कंट्रोल करा.