Premium

बँकॉकला निघालेल्या नवरा बायकोची विमानातच खडाजंगी! दिल्लीच्या हद्दीत विमान येताच..अनोख्या प्रवासाची गोष्ट

Bangkok Flight: बँकॉकला जाणारे लुफ्थांसा विमान बुधवारी अचानक दिल्लीकडे वळवण्यात आले. विमान सुरुवातीला पाकिस्तानमध्ये उतरवण्याची विनंती करण्यात आली होती पण..

Husband Wife Going To Bangkok Fight Majorly Lufthansa flight diverted to Delhi Tried To Land In pakistan But Reached Delhi
विमान दिल्ली विमानतळावर उतरले व पुरुष प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले आणि मग (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Husband Wife Fight: जर्मनीच्या म्युनिक येथून बँकॉकला जाणारे लुफ्थांसा विमान बुधवारी प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनामुळे दिल्लीकडे वळवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लुफ्थांसा (LH772) विमानात पती – पत्नीच्या वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की शेवटी विमान वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. जोडप्याच्या भांडणाचे कारण नेमके स्पष्ट झालेले नाही. अशी माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (IGIA) विमान सुरक्षा वृत्तसंस्थेने ANI ला दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार, विमान सुरुवातीला पाकिस्तानमध्ये उतरवण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु अज्ञात कारणांमुळे, विनंती नाकारण्यात आली आणि त्यानंतर, विमान दिल्ली विमानतळावर उतरले व पुरुष प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले व विमानतळावरील सुरक्षारक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. लुफ्थान्साच्या माहितीनुसार, वाद घालणारा प्रवासी हा जर्मन असून त्याने माफी मागितली आहे.

लुफ्थांसाने एका निवेदनात म्हटले आहे की, विमानातील एका प्रवाशामुळे विमान दिल्लीकडे वळवण्यात आले. बुधवारी २७ नोव्हेंबरला हा प्रकार घडला. यानंतर बँकॉकला जाणाऱ्या विमानाला थोडा विलंब झाला. दरम्यान, या व्यक्तीस आता माफी मागितल्यावर दुसऱ्या विमानाने जर्मनीला पाठवले जाईल का याविषयी निर्णय प्रलंबित आहे.

दुसरीकडे, अगदी मागीलच महिन्यात, एका पुरुष प्रवाशाने दिल्लीला जाणार्‍या इजिप्त एअर विमानात काही सीट्स खराब केल्याचा आरोप लगावण्यात आला होता. या व्यक्तीने सहप्रवाशांसह भांडण केले होते, या दोघांना नंतर दिल्ली विमानतळावर पकडण्यात आले होते. त्यानंतर या प्रवाशाला पुढील चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हे ही वाचा<< “त्या लोकांची दूरदृष्टी..” सुनील गावसकरांची ‘सचिन’साठी खास पोस्ट; तेंडुलकरची ‘कमेंट’ गुगली ठरली लक्षवेधी

गेल्या वर्षीसुद्धा शंकर मिश्रा नावाच्या ३४ वर्षीय व्यक्तीने न्यूयॉर्क-नवी दिल्ली एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप केला गेला होता. महिलेने एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत ४ जानेवारी रोजी एफआयआर नोंदवला होता. त्याला ६ जानेवारी रोजी बंगळुरू येथून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband wife going to bangkok fight majorly lufthansa flight diverted to delhi tried to land in pakistan but reached delhi svs

First published on: 29-11-2023 at 18:29 IST
Next Story
मार्केटमध्ये आले मेहेंदीच्या डिझाईनचे बिस्कीट; VIDEO पाहून लोकांनी दिली पसंती