नागपूर : ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘एसजेएफ’नावाच्या दोन दहशतवादी संघटना विमानतळ, रेल्वेस्थानक, मंदिर, विमान आणि रेल्वेत बॉम्बस्फोट करणार आहेत. दोन्ही संघटनांना ७५ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे.’ असा ‘ई-मेल’ पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, रेल्वे विभाग आणि इंडिगो एअर लाईनचे सहायक व्यवस्थापक यांच्या मेलवर जगदीश श्रीराम उईके याने पाठवला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करुन जगदीशला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रपरिषदेत दिली. आता जगदीश हा विविध तपास यंत्रणेच्या रडारवर आला असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवून तसेच दहशतवादी संघटना विशिष्ट कोडचा वापर करुन धमकीचा ई मेल पाठवितात. तसाच हुबेहुब ईमेल तयार करून तो विविध विमान कंपन्या, शासकीय कार्यालयांना पाठवित होता. ई मेलने विमानात बॉम्ब स्फोटाची होण्याची धमकी देणारा जगदीश उईके (३५) रा. चंदननगर याला नागपूर पोलिसांनी ३१ ऑक्टोबरला सकाळी अटक केली. न्यायालयाने त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून बरीच माहिती काढून घ्यायची असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची न्यायालयाला विनंती करणार आहेत.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Praful Patel criticized Raj Thackeray for his statement
अजून मूल जन्माला आलं नाही, त्याआधीच त्याचं साक्षगंध, लग्न…, खा. प्रफुल्ल पटेल यांचा ‘यांना’ टोला
BSP candidate for Chikhali Assembly Constituency Advocate Shankar Sesha Rao Chavan has attacked
बुलढाणा : चिखली मतदारसंघात, बसप उमेदवारावर हल्ला…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा…“गडचिरोलीत वडेट्टीवारांचा हस्तक्षेप कधीपर्यंत सहन करणार,” माजी आमदाराचा सवाल

u

जगदीश हा मुळचा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचा आहे. त्याला आई आणि एक बहिण आहे. काही वर्षांपासून तो नागपुरात एकटाच राहतो. अकरावीपर्यंत त्याने शिक्षण घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. मात्र, ज्या पध्दतीने त्याने धमकीचे ईमेल पाठविले त्यावरून त्याला तांत्रिक ज्ञान भरपूर असल्याचे दिसून येते. तपासात त्याचा दहशतवाद्यांशी काही संबध नसल्याचेही स्पष्ट होत आहे. काही वर्षापूर्वी त्याने “आतंकवादी एक राक्षस’ हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीत लिहिले होते.

त्या पुस्तकात दहशतवाद नियंत्रणात कसा येईल. त्यांची क्रूरता, जिहाद यावर माहिती आहे. पुस्तकाचे त्याला प्रकाशन करायचे होते. यासाठी त्याने सरकारकडे ई मेल करून प्रकाशनासाठी विनंती केली होती. सरकारमधील महत्वाच्या व्यक्तींशी भेट झाल्यानंतर दहशतवाद्यांचे मनसुबे तो सांगणार होता. मात्र, त्याच्या विनंतीकडे कोणीही लक्ष देत नव्हते. त्यामुळे धमकीचे ई मेल करून सरकारचे लक्ष वेधून घेत होता. एकंदरीत कृत्य आणि वागणूक पाहून पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. मानसिक तज्ज्ञाकडूनही त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येणार आहे. नागपूरसह देशातील विविध तपास यंत्रणा चौकशीसाठी त्याला ताब्यात घेणार आहेत. पत्रकार परिषदेला अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, उपायुक्त श्वेता खेडकर उपस्थित होत्या.

हेही वाचा…लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर

देशविघातक संघटनेचा संबध आहे काय?

अटकेतील आरोपी जगदीशकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये आरोपीचा मेल आयडी मिळून आला. आरोपी त्याच आयडीचा वापर करीत होता. एकूण ३५४ ईमेल केल्याचे निष्पन्न झाले. तो ईमेल करताना ‘सिक्रेट कोड’चा वापर केला आहे. त्यामध्ये त्याने ३१ विमानतळ, रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळ, मार्केट आणि बाजारासह ३१ ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती. त्याच्या मागे कोणत्या देशविघातक संघटनेचा संबध आहे काय? तसेच आरोपीची भूमिका काय? याचा सखोल तपास सायबर पोलीस करीत आहेत.

पंतप्रधान कार्यालय आणि मंत्रालयात चकरा

आरोपी जगदीश हा वारंवार पंतप्रधान कार्यालय, मंत्रालय मुंबई या ठिकाणी वारंवार ये-जा करीत होता. त्याने इंडिगो एअर लाईन्सचे संदीप डोंगरे यांच्या मेल आयडीवर मेल केला होता. त्यात एका ‘स्पेशल कोड’नुसार देशात ३० ऑक्टोबरपासून विमानतळ, विमान, मंदिर, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी संघटना बॉम्ब स्फोट करणार आहेत. याचे कंत्राट ‘जैश-ए-मोहम्मद आणि एसजेएफ या दोन आतंकवादी संघटनेला ७५ हजार कोटी रुपयांत दिले आहे, असे नमूद होते. फिर्यादी डोंगरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.

Story img Loader