सोशल नेटवर्किंगवर वेळोवेळी काही ना काही ट्रेण्ड व्हायरल होत असतात. सध्या असाच एक ट्रेण्ड सोशल नेटवर्किंगवर चांगलाच गाजत आहेत. “I’ve a joke on… But…” या वाक्याचा आधार एक एखाद्याबद्दल उपहासात्मक कमेंट करण्याचा हा ट्रेण्ड आहे. म्हणजेच उदाहरण द्याचं झालं तर ‘माझ्याकडे लॉकडाउनसंदर्भात जोक आहे पण मी तो लॉकडाउनसंपल्यावरच सांगेन,’ किंवा ‘माझ्याकडे मोबाइल रेंजबद्दल जोक आहे पण तो मी रेंज असल्यावर पोस्ट करेन,’ अशाच प्रकारची काही वाक्य मागील अनेक दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहेत. याच ट्रेण्डमध्ये एका पुणेकराने प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाल्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र चितळे बंधूच्या अकाउंटवरुन त्याला असा काही खास चितळे स्पेशल पुणेकर टोला लगावण्यात आला की मूळ टोमण्यापेक्षा चितळेंनी काढलेला हा चिमटाच जास्त व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> ‘आय’ला चुकला… स्पेलिंग चुकलं अन् चार वर्षाची तुरुंगवारी निश्चित झाली

पुण्यातल्या चितळे बंधूंचे दुपारचे बंद दुकान हा पुण्याबद्दल बोलताना कायमच चेष्टेचा विषय असल्याचे पहायला मिळतं. मात्र २०१७ च्या सुरुवातीलच  ‘चितळे बंधू’ यांनी दुपारी एक ते चार दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही आजही अनेकदा चितळे बंधूंना यावरुन ट्रोल केलं जातं. या व्हायरल ट्रेण्डमध्येही अदिल सय्यद या व्यक्तीने ट्विटवरुन चितळे ग्रुपच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करत टोमणा मारला. “माझ्याकडे चितळे बंधूंवर विनोद आहे पण तुम्हाला तो दुपारी एक ते चारच्या दरम्यान कळणार नाही,” असं ट्विट सय्यदने केलं होतं.

थेट चितळे बंधूंच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केल्याने त्यांनी या ट्विटला खास स्टाइलने उत्तर दिलं. “आमच्याकडे एक जोक आहे. मात्र तुम्हाला तो ऐकण्यासाठी रांगेत उभे रहावे लागेल,” असं उत्तर या ट्विटला चितळे बंधूंकडून देण्यात आलं. चितळे बंधू यांच्या दुकानासमोर अनेकदा गिऱ्हाईकांची मोठी रांग दिसून येते. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा जोक ऐकण्यासाठी रांगेत उभं रहावं लागेल असा नेटकऱ्यांच्या भाषेतला क्लासिक रिप्लाय दिला.

यावर सय्यदने आम्हाला चितळेंचे प्रोडक्ट आवडतात म्हणून आम्ही रांगेत उभे राहून घेतो असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> जितका सुंदर फोटो तितकीच सुंदर कथा… जाणून घ्या दुबईमध्ये व्हायरल होणाऱ्या भारतीयाच्या फोटोची गोष्टी

सध्या सोशल नेटवर्किंगवर या संभाषणाचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have a joke on chitale bandhu pune tweet went viral scsg
First published on: 28-07-2020 at 13:18 IST