Premium

Video : लंडनमध्ये भारतीय गाण्याची क्रेज! मेट्रोत तरुणाने ‘छैया छैया’ गाण्यावर केला डान्स…

लंडनच्या मेट्रोत भारतीय गाण्यावर तरुणाने ‘छैया छैया’ गाण्यावर केला डान्स…

Indian song craze in London A young man danced on the song 'Chaiya Chaiya' in the metro
(सौजन्य:इन्स्टाग्राम/@goodnewsmovement) Video : लंडनमध्ये भारतीय गाण्याची क्रेज! मेट्रोत तरुणाने 'छैया छैया' गाण्यावर केला डान्स…

Viral Video : प्रवासादरम्यान वेळ जावा यासाठी आपल्यातील बरेचजण विविध गोष्टी करताना दिसून येतात. काही जण लिखाण करतात, काही जण आवडीची पुस्तके वाचतात; तर काही जण मोबाईलमध्ये चित्रपट किंवा गाणी ऐकून प्रवास आनंदी करतात. या दरम्यान हेडफोनवर जुनी गाणी किंवा आवडीचं गाणं लागलं की आपण गाणं गुणगुणायला लागतो किंवा गाणं ऐकताच आपले पाय ठेका धरायला सुरुवात करतात आणि आपण डान्स करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. हेडफोनवर गाणं वाजताच लंडनमध्ये मेट्रोत एक व्यक्ती डान्स करायला सुरुवात करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणारा व्हिडीओ लंडनमधील आहे. लंडनच्या मेट्रो स्थानकावर एक तरुण भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसून आला आहे. सुरुवातीला प्रवाशांसोबत बसलेला हा तरुण आजूबाजूला नजर फिरवून अचानक उठून उभा राहतो. तरुणाने कानाला हेडफोन लावलेले असतात आणि तो मेट्रोतून प्रवास करत असतो. तेवढ्यात अचानक गाणं सुरू होतं आणि तरुण डान्स करायला सुरुवात करतो. बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच अर्थात शाहरुख खानचा ९०’च्या दशकातील ‘दिल से’ या चित्रपटातील “छैया छैया” हे गाणं तरुणाच्या हेडफोनवर ऐकायला येऊ लागतं आणि तरुण गाण्यावर ठेका धरत डान्स करायला सुरवात करतो. हे बघताच आजूबाजूचे प्रवासी तरुणाकडे आश्चर्याने बघायला सुरुवात करतात. लंडनमध्ये तरुण गाण्यातील हुबेहूब स्टेप्स करत; कधी एक्सेलेटर, तर कधी मेट्रो स्थानकावर, तर कधी प्रवाशांसमोर मेट्रोत डान्स करताना दिसून आला आहे. लंडनच्या मेट्रोत तरुणाने भारतीय गाण्यावर केलेला डान्स एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा… लहान मुलाच्या गाण्यावर नाचतोय घोडा, मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतायत, ”हा तर चमत्कार…”

व्हिडीओ नक्की बघा :

“छैया छैया”चं लंडन एडिशन :

भारतीय गाण्याची क्रेज परदेशात अनेकदा दिसून आली आहे. भारताच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांवर परदेशातील रहिवासी अनेकदा डान्स करताना दिसून आले आहेत. वर्षानुवर्षे उलटून गेली तरीही काही गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात; तसंच काहीसं शाहरुख खान आणि मलायका अरोराचं “छैया छैया” या गाण्याचंसुद्धा आहे. आजसुद्धा तरुण मंडळी तितक्याचं आवडीने त्यांचं “छैया छैया” हे गाणं ऐकतात आणि त्याच्यावर ठेका धरताना दिसून येतात. तसंच काहीसं या व्हिडीओतसुद्धा पहायला मिळालं आहे. “छैया छैया” या भारतीय गाण्यावर तरुण लंडनच्या मेट्रोत हुबेहूब सिग्नेचर स्टेप करताना दिसून आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @zanethad या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “छैया छैया लंडन एडिशन” असे या व्हिडीओला कॅप्शनदेखील देण्यात आले आहे. तसेच एवढ्या प्रवाशांमध्ये डान्स करणाऱ्या तरुणाला बघून काही जण त्याच्या हिमतीला दाद देताना दिसत आहेत; तर काही जण दुसरा व्हिडीओ साकी साकी या गाण्यावर बनव असे म्हणतानासुद्धा कमेंटमध्ये दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian song craze in london a young man danced on the song chaiya chaiya in the metro asp

First published on: 13-09-2023 at 18:22 IST
Next Story
‘जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक आहेत ‘या’ मुंग्या; ब्रिटनवर करणार हल्ला? शास्त्रज्ञांचा इशारा